Lalbaug Video: काल ०६ सप्टेंबर रोजी अनंद चतुर्दशीला बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. मुंबईसह राज्यभरात विराजमान झालेल्या सगळ्या गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन झालं. अजूनही अनेक ठिकाणी विसर्जन सुरूच आहे. अशात गणेशभक्तांची पंढरी असलेल्या लालबागमध्ये लाखो भाविकांची गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी गर्दी जमते. ही गर्दी अनेकदा कंट्रोल करणं कठीण असतं पण यामुळे त्रास होतो तो फक्त सामान्य नागरिकांनाच.
गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांबरोबर अनेकदा गैरवर्तन केलं जातं. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या लालबागमधील असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. नेमकं काय घडलंय लालबागच्या त्या भाविकांबरोबर, जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (Lalbaug Shocking Video)
यंदाही लालबागमधील गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, भाविक तासनतास रांगेत उभे होते. पण अशावेळी दर्शनासाठी आलेल्या भावंडांबरोबर अतिशय धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो स्टेजवर उभं राहून एका कार्यकर्ताने चक्क लाथेनेच खाली उभे असलेल्या भाविक भावंडाना मारलं. जोरजोरात आरडाओरडा करून कार्यकर्ता स्टेजवरून लात मारून भाऊ आणि बहिणीशी गैरवर्तन करताना दिसला. ही घटना कोणीतरी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडीओसाठी क्लिक करा

दरम्यान, ही घटना लालबागमधील नेमक्या कोणत्या मंडळात घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. पण कार्यकर्ते आणि मंडळांच्या अशा मुजोरीचा नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @unseen__mumbai च्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसंच “लालबागमध्ये भाऊ बहिणीला लाथेने मारलंय, हीच का तुमची लालबागची शान” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला काहीच वेळात १.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “मित्रांनो, हे काही अर्थपूर्ण नाही. थोडा स्वाभिमान बाळगा आणि लालबाग गणपतीला भेट देणे थांबवा. तुमच्या गाडीतील मूर्तीची पूजा करा, यापेक्षा, तो वर्षभर तुम्हाला सुरक्षित ठेवतो आणि लोक याच्या मागे धावतात. हा मूर्खपणा आहे. गणपती आपल्यापेक्षा वरचा असू शकतो, कार्यकर्त्यांपेक्षा वरचा नाही.” तर दुसऱ्यानं “कार्यकर्त्यांचा हा कसला माज? त्याचेच पाय तोडले पाहिजे होते.” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “खेचा आणि मारा याला, बस्स झाला यांचा माजुर्डेपणा. लोकांना पण अक्कल नाही ”