Malad Local Blast Viral Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.

याच मुंबई लोकलमध्ये अनेकदा अपघातदेखील होताना दिसतात. सध्या मुंबई लोकलचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात मालाड रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबली असताना अचानक काय झालं पाहा…

व्हायरल व्हिडीओ (Mumbai Local Accident Video)

मुंबई लोकलचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये मुंबई लोकलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आगीचा भडका उड्याल्याचं दिसून येतंय. व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घटना सविस्तर सांगितली असून कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ”चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी लोकल ११.४६ वाजता मालाड स्थानकात आल्यावर सुरूवातीला ओव्हरहेड वायर तुटल्याचे सांगण्यात आले. पण फर्स्ट क्लासच्या बाजूच्या जनरल डब्यात एकापाठोपाठ एक असे एकाच डब्यात ३ स्फोट झाले. सुदैवाने गाडी प्लॅटफॉर्मवर थांबलेली असल्याने स्फोट होण्याआधीच लोकांनी धडाधड उड्या मारल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @navi_mumbai_update या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २. ८ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “मालाड रेल्वे स्थानकात आलेल्या लोकलमध्ये झाले ३ स्फोट” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ १२ मे रोजी शेअर करण्यात आला असून हा जुना व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हेवी वॉल्टेज ट्रेन वायर्समुळे स्पार्क झाला होता, बाकी काहीच झालं नाही” तर दुसऱ्याने “बापरे, आजकाल हे काय होत आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मुंबई लोकल ट्रेन ट्रॅव्हल साठी सेफ नाही.”