Poor Condition Of Indian Railway AC 3-Tier Coaches : भारतीय रेल्वेने प्रवास करताना अनेकदा तिकीट आणि सर्व गोष्टी असूनही इतरांच्या चुकीमुळे जीव धोक्यात घालण्याची वेळ येते. अशा बऱ्याच त्रासदायक अनुभवांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. असाच काहीसा अनुभव एका महिलेला आला आहे. संबंधित महिलेच्या भावाने ट्रेनमधील एक भयानक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने ट्रेनचे तिकीट असतानाही प्रवाशांना प्रवासादरम्यान किती धोकादायक आणि जीवघेण्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते हे उघड केले आहे.

मुलाला वाचविण्यासाठी बहिणीची चालत्या ट्रेनमधून उडी अन्…

रचित जैन असे या तरुणाचे नाव असून, त्याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या बहिणीला ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करताना आलेला जीवघेणा अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की, ट्रेनमध्ये चढताना गर्दी असल्याने बहिणीच्या हातून मुलाचा हात सुटला आणि तो प्लॅटफॉर्मवरच राहिला. यावेळी बहिणीकडे चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हे सर्व ३ एसी कोचमधून प्रवास करताना घडले आहे.

तरुणाने ट्रेनच्या एंट्री गेटजवळचा एक फोटोदेखील शेअर करीत सांगितले की, लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे माझ्या बहिणीला ट्रेनमध्ये चढणेही कठीण झाले. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

त्याने पुढे सांगितले की, या घटनेत बहिणीला दुखापत झाली. आरामदायी प्रवासासाठी पैसे देणाऱ्या प्रवाशांना शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचाही वापर करणे शक्य होत नाही. अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ही खरेच चिंताजनक बाब आहे.

Photo : हद्दच झाली राव! विमानात कपलचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर सीटवर झोपून…

ट्रेनमध्ये शिरण्यास जागा नाही

त्याने आणखी पुढे लिहिले की, तिकीट न काढताही लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे लोकांना ट्रेनच्या आत शिरण्यासाठीही जागा राहत नाही; ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. अशा परिस्थितीचे त्वरित निराकरण करण्यासाठी कृपया रेल्वे पोलिस किंवा तिकीट कार्यालयाशी संपर्क साधावा. कारण- सर्व प्रवाशांचा सुरक्षित, आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. त्याने ही पोस्ट ट्रेनचा पीएनआर आणि कोच नंबर समाविष्ट करीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केली आहे.

ही पोस्ट आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी त्यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले की, गेल्या महिन्यात आमच्याबरोबरही असेच काहीसे घडले. आम्हाला ट्रेनमधून बाहेर जाण्यासाठी जागा मिळाली नाही. त्याच वेळी आणखी एका युजरने लिहिले की, ट्रेनमधील थर्ड एसी कोचदेखील सामान्य डब्यासारखा बनत आहे. अशा स्वरूपाच्या पोस्ट करीत, रेल्वे मंत्रालयाने या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अनेक युजर्सकडून केली जात आहे.