scorecardresearch

मॅच आणि बायकोचा मेकअप.. दोघांची अशी घातली सांगड; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले ‘याला तर…’

स्टेडियममध्ये मॅच पाहत असताना बायकोला मेकअपमध्ये मदत करणाऱ्या एका माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

मॅच आणि बायकोचा मेकअप.. दोघांची अशी घातली सांगड; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले ‘याला तर…’
स्टेडियममधील व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

पुरुषांना असलेले क्रिकेटचे वेड सर्वांनाच परिचयाचे असेल. व्यस्त कामाच्या शेड्युलमधून वेळ काढत, रात्री उशीराची मॅच असेल तर त्यासाठी जागे राहून मॅच पाहिली जाते. तर कधीकधी स्टेडियममधील लाईव्ह मॅचचाही अनुभव घेतला जातो. यावेळी कदाचित मॅच पाहताना हे क्रिकेटप्रेमी त्यात रमून जात असतील, त्यांना कशाचेही भान उरत नसेल. यावेळी आपल्याला कोणीही त्रास देऊ नये किंवा मॅच पाहण्यामध्ये कोणताही अडथळा आणू नये असे या व्यक्तींना वाटत असेल, पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओतून काही वेगळेच चित्र दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक जोडपं स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आल्याचे दिसत आहे. यावेळी बायकोला मेकअप करण्यात तिचा नवरा मदत करत असल्याचे दिसत आहे. त्याने फोन हातात पकडला आहे, ज्यामुळे पत्नीला मेकअप करण्यात मदत होत आहे. एकाबाजुला त्याचे मॅच पाहणही सुरू आहे. अशाप्रकारे बायकोचा मेकअप आणि मॅच याची योग्य सांगड त्याने घातली आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा- Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

या व्हिडीओतील नवऱ्याच्या मदत करण्याच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. नेटकऱ्यांनी या माणसाला ‘हजबंड ऑफ द यीअर’ या पुरस्कार देण्यात यावा ही मागणी देखील केली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 12:34 IST

संबंधित बातम्या