scorecardresearch

किंग कोब्राला किस करायला निघाला हा माणूस आणि मग पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO

काही व्यक्तींना मोठी रिस्क घेण्याची भारीच हौस असते. कधी कधी ही हौस जीवाशी येते.

किंग कोब्राला किस करायला निघाला हा माणूस आणि मग पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO
(Photo: Twitter/HateDetectors)

King Cobra Video Viral : सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यांमध्ये साप, वाघ, सिंह, मगर सारखे प्राणी असतात. या प्राण्यांचे व्हिडीओ हे असे काही व्हिडीओ असतात. जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सापाचा आहे. परंतू हा कोणता साधा साप नाही तर तो कोब्रा साप आहे. किंग कोब्रा हा इतका खरतनाक असतो की त्याचा दंश होताच व्यक्ती मरतो. कारण तो इतर सापांपेक्षाही खूपच विषारी आहे. ज्यामुळे त्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं. पण काही व्यक्तींना ही मोठी रिस्क घेण्याची भारीच हौस असते. कधी कधी ही हौस जीवाशी येते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कर्नाटकमधला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती सापाला किस करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने किस करण्याचा प्रयत्न करताच अचानक सापाने त्याला चावा घेतला. यानंतर मात्र एकच गोंधळ उडाला. काही लोक सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे. पण हा साप पळून जातो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एटीएमच्या समोर विचित्र माणूस बराच वेळ उभा होता, मग जे कळलं ते थक्क करणारं होतं

या घटनेनंतर तरुणाची प्रकृती खालावली. लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अॅलेक्स आणि रॉनी हे तरूण सापाला पकडण्यासाठी आले होते. सापाला पकडल्यानंतर त्याला किस करणं या तरूणाला चांगलंच महागात पडलं. दोन दिवसांपूर्वी या दोन तरूणांनी सापाला पकडलं होतं. त्यानंतर यातल्या एका तरूणाने सापाला पकडल्यानंतर किस करताच सापाने दंश केला.

आणखी वाचा : या महिलेला महाकाय अजगराने गुंडाळलं, VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. दुसरा यूजर म्हणतो की, हे आतापर्यंतचे सगळ्यात बेस्ट लिप-टू-लिप आहे. काही लोक लिहित आहेत, “तो खरोखर जगला का, पण आश्चर्य वाटलं की त्याने हे करण्याचा विचार कसा केला? मला एवढंच म्हणायचं आहे की त्या व्यक्तीसोबत जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं.”

आणखी वाचा : बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडीपुढे आडवा आला महाकाय साप, मग या व्यक्तीने हाताने उचलून फेकला नेमकं त्याचवेळी…

हा व्हिडीओ HateDetectors नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात व्हायरल करून लोकांना असं धाडस न करण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या