भारताच्या हरनाझ संधूने सोमवारी पॅराग्वेच्या नादिया फरेरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला मासवाने यांना हरवून ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब पटकावला. हरनाजच्या या विजयामागे एका ट्रान्सवुमनचा मोठा वाटा होता, जो सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.

वास्तविक, हरनाझने ग्रँड फिनालेसाठी ट्रान्सवुमन फॅशन डिझायनर साईशा शिंदे (आधीचा स्वप्नील शिंदे ) यांनी डिझाइन केलेला सिल्व्हर सिक्विन लेहेंगा परिधान केला होता. ज्यामध्ये २१ वर्षांची दिवा खूपच सुंदर दिसत होती. फिनालेदरम्यान हरनाजने परिधान केलेला गाऊन सर्वांनाच आवडला. तसेच हरनाजच्या त्या गाऊनसोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

( हे ही वाचा: माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा… )

( हे ही वाचा: संतापलेल्या नवरदेवाच्या भावाने विवाह सोहळ्यात वाहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद)

डिटेल मध्ये बोलायचं झालं तर हरनाझने ‘मिस युनिव्हर्स २०२१ फिनाले’ मध्ये चांदीच्या अलंकारांसह बेज रंगाचा गाऊन परिधान केला होता. शीयर बॉडी-हगिंग गाउनमध्ये दीप व्ही-नेकलाइन होती, ज्यामुळे तो ड्रेस लक्षवेधी बनला. मिस युनिव्हर्सने तिचा लूक स्टोन स्टडेड ड्रॉप इयरिंग्सने पूर्ण केला. तसेच, हरनाजने ड्यू बेस, पिंक ब्लश, न्यूट्रल लिपस्टिक आणि बोल्ड आय मेकअपद्वारे तिच्या लुकला फाइनल टच दिला.

( हे ही वाचा: अंकिता लोखंडेला साखरपुड्यात आली सुशांत सिंग राजपूतची आठवण; व्हिडीओ व्हायरल )

( हे ही वाचा: Miss Universe 2021: विजयानंतर हरनाज संधू म्हणाली ‘चक दे फट्टे’; Video Viral )

डिझायनरची मेहनत

हरनाजच्या या डिझायनर गाऊनमागे ट्रान्सवुमन डिझायनर साईशा शिंदेची मेहनत आहे. या वर्षी जानेवारीमध्येच, हरनाजच्या गाऊनचा डिझायनर स्वप्नील शिंदे, ट्रान्सवुमन म्हणून समोर आला आणि त्याने इन्स्टाग्रामवर स्वतःची ओळख सायशा शिंदे म्हणून केली. करीना कपूर, श्रद्धा कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सायशाचे डिझायनर कपडे परिधान केले आहेत. फॅशन सारख्या चित्रपटातील कपड्यांवरील कामासाठीही ती ओळखली जाते. ४० वर्षीय डिझायनरने हरनाझसाठी हा गाऊन तयार करण्यासाठी केलेल्या मेहनतीची झलक इंस्टाग्रामवर बघायला मिळेल.