Viral video: तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. अलीकडच्या काळात आई-वडील आपापल्या कामात व्यग्र असतात. परिणामत: कित्येकदा त्यांचे लहान मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत. बाहेर गेल्यावर तर लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते, अन्यथा काय होतं हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कळेल.

ही घटना मुंबईतील गोरेगांव येथील बांगूर नगर मेट्रो स्टेशनवर घडली. २ वर्षांचा मुलगा मेट्रोमधून खाली उतरलाय हे लक्षात येताच स्टेशन अटेंडंट संकेत चोडणकर यानं लगेचच ट्रेन ऑपरेटरला सूचना दिली आणि मेट्रोचे दरवाजे उघडायला सांगितले. त्यानंतर संकेत यांनी पळत जाऊन त्या मुलाला सुरक्षित स्थळी आणलं आणि दरवाजे उघडल्यानंतर त्याला पुन्हा डब्यात चढायला मदत केली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक २ वर्षांचा मुलगा मेट्रोनं प्रवास करत होता. स्टेशनवर दरवाजा बंद होत असताना तो अचानक बाहेर आला. अन् पुन्हा डब्यात चढण्याआधीच मेट्रोचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे त्याचे पालक डब्यात अन् तो स्टेशनवर अशी स्थिती निर्माण झाली. पण सुदैवानं एका मराठमोळ्या स्टेशन अटेंडंटच्या हुशारीमुळे मेट्रोचे दरवाजे पुन्हा उघडले आणि तो मुलगा पुन्हा एकदा डब्यामध्ये चढू शकला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @MMMOCL_Official नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून संकेतचं कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, “सतर्क राहून दिवस वाचवल्याबद्दल महा मुंबई मेट्रो कर्मचाऱ्यांना खूप खूप आदर.” दुसरा म्हणतो, “तुमचे मेट्रो कर्मचारी हुशार आहेत. प्लॅटफॉर्म स्वच्छ आहेत, गाड्या वेळेवर/स्वच्छ आहेत आणि सुरक्षा/इतर कर्मचारी सभ्य आहेत. #Metro2A कडून वैयक्तिक अनुभव. उत्तम काम सुरू ठेवा!!” आणखी एकानं, “संकेत आणि मेट्रो पायलट यांच्या प्रशंसनीय प्रयत्नांसाठी त्यांचे कौतुक. संकेतजींचे कौतुक आणि सलाम…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.