scorecardresearch

Premium

Viral : मुंबई पोलिसांना नक्की सांगायचंय तरी काय?

सोशल मीडियावर तरुणांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकांऊटवर नेहमीच काहीतरी भन्नाट आणि वेगळं पाहायला मिळतं.

या फोटोद्वारे मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं आहे.
या फोटोद्वारे मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं आहे.

सोशल मीडियावर तरुणांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकांऊटवर नेहमीच काहीतरी भन्नाट आणि वेगळं पाहायला मिळतं. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी हटके पद्धतीनं एखादी गोष्ट लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न नेहमीच या अकाऊंटवरून केला जातो. तर यावेळी सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

या फोटोद्वारे मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रत्येक नेटिझन्स आणि इंटरनेटद्वारे व्यवहार करणाऱ्या प्रत्येकानं आपल्या अकाऊंटची सुरक्षा घेतली पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हे मीम्स शेअर केलंय. अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकांनी आपला पासवर्ड सेट करताना काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. तुमचा पासवर्ड तितकाच स्ट्राँग असला पाहिजे नाहितर तुम्ही अडचणीत येऊ शकता हे मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे समजावून सांगितलं आहे.

increasing suicide of students
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या! केंद्राने उचलले पाऊल; काय आहेत शिफारशी? जाणून घ्या…
jitendra awhad
“शेरास सव्वाशेर गुजराती, मारवाडी मराठी लोकांना लाथ घालतो तेव्हा…”, मुंबईतील ‘त्या’ प्रकारावर आव्हाडांची टिप्पणी
Mahindra Cars Price Hike
सणासुदीत आनंद महिंद्रांनी ग्राहकांना दिला धक्का! सात सीटर कारसहित ‘या’ अनेक लोकप्रिय गाड्यांच्या वाढवल्या किमती
Gambling dens of office bearers
खळबळजनक! विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे जुगार अड्डे

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचं महत्त्व पटवून सांगताना या ट्विटर अकाऊंटवरून एक कोडं शेअर करण्यात आलं होतं. ज्याद्वारे प्रत्येक नागरिकांला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police use kurkure lock meme to give password

First published on: 11-06-2018 at 10:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×