आयुष्यमान खुराना आणि अनन्या पांडे यांचा आगामी कॉमेडी चित्रपट ‘ड्रीम गर्ल २’ लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा मनोरंजक ट्रेलर रिलीज झाला. आयुष्मान खुराना या चित्रपटात पूजाची भूमिका साकारत आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ मधील ‘मेरे दिल का टेलिफोन’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. केवळ चाहतेच नाही तर मुंबई पोलिसांनाही या गाण्याने वेड लावले आहे. मुंबई पोलिसांनी या गाण्याचा वापर करत चालकांना ट्रॅफिक नियमांसंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रॅफिक नियमांसाठी मुंबई पोलिसांकडून ‘ड्रिम गर्ल’च्या गाण्यांचा वापर

मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर ट्रॅफिकसंदर्भात जनजागृती करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, बाईक चालवणारा एक व्यक्ती फोनवर बोलत, वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. यावेळी ट्रॅफिक पोलिसांना पाहताच तो रस्ता बदलण्याचा प्रयत्न करत असतो, पण अशाप्रकारे बाईक चालवल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करत चालकांना गाडी चालवताना फोनवर न बोलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय गाडी चालवताना ट्रॅफिक सेफ्टी नियम का पाळले पाहिजे हे चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर युजर्सनी या मोहिमेसाठी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.

मुंबई पोलिसांनी या पोस्टमध्ये चित्रपटातील काही डायलॉगचा वापर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज तो त्याच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक परफॉर्मन्स देणार आहे? ज्याचे परिणाम जास्त धोकादायक असू शकतात! ड्रीम गर्लचा कॉल? याला सर्वात वाईट स्वप्न बनवू नका. तुमचे ड्रीम गर्लसह राहण्याचे स्वप्न भंग होऊ देऊ नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये तुम्हाला कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामा पाहायला मिळेल. एकता कपूर आणि शोभा कपूर निर्मित आणि राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. तर परेश रावल, राजपाल यादव, विजय राज, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, मनोज जोशी आणि अन्नू कपूर अशी तगडी स्टार कास्ट आहे. हा चित्रपट 2019 मध्ये आलेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे. पहिल्या भागात आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.