तुम्ही पोलिस ठाण्यावर केव्हा जाता? जेव्हा तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवते किंवा तुमच्याकडे वा आसपास एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्याबाबत तक्रार करण्यासाठी तुम्ही पोलिस ठाणे गाठता. त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला पूर्ण मदत करावी, अशी तुमची अपेक्षा असते. पण कोणालाही दृश्य स्वरूपात दिसू न शकणारी गोष्ट शोधण्यासाठी कधी कोणी पोलिसांची मदत घेतली आहे, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? नाही ना! पण मंडळी एका मुलीनं असं केलं आहे. एका मुलीनं मुंबई पोलिसांना एक ट्वीट टॅग करीत अनोखी तक्रार केली आहे; जी आता व्हायरल होत आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी एकदम बॉलीवूड स्टाईलने उत्तर दिलं आहे.

मुलीने गमावलेली शांतता परत मिळवण्यासाठी मागितली मदत

वेदिका आर्या नावाच्या एका मुलीनं सोशल मीडियावर एक ट्वीट केलं आहे. हे ट्वीट तिनं मुंबई पोलिसांना टॅग करीत लिहिलंय की, मी पोलिस ठाण्यावर जात आहे. मी माझी शांतता हरवून बसली आहे. या ट्वीटला मुंबई पोलिसांनी बॉलीवूड स्टाईलने एक मजेशीर उत्तर दिलं आहे. उत्तरादाखल पोलिसांनी लिहिलंय की, मिस आर्या, आपल्यापैकी बरेच जण सुकूनच्या शोधात आहेत. तुमच्या आमच्यावरील विश्वासाची आम्ही प्रशंसा करतो आणि आम्हाला खात्री आहे की, तुम्हाला तो तुमच्या आत्म्यात सापडेल. दिसणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टींसाठी तुम्ही ‘अर्थात’ आमच्याकडे येऊ शकता. मुंबई पोलिसांचं हे मजेशीर ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या दोघांमधील ट्वीटला लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दोघांमधील या ट्वीटचा आनंद घेत एका युजरने लिहिलंय की, मित्रांसोबत तुम्हाला नेहमी शांतता मिळेल. आणखी एका युजरनं लिहिलंय की, मला आश्चर्य वाटतंय; पण एखाद्या मुलानं असं ट्वीट केलं असतं, तर मुंबई पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली असती? तर दुसर्‍या युजरनं लिहिलंय की, शायरना रिप्लाय! सर, तुम्ही शब्दांनी मन मोडलेल्या प्रेमीसारखे दिसता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पोस्ट एक लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना ही पोस्ट मनोरंजक वाटली; तर काहींनी इतर महत्त्वाच्या पदांवर विभागानं कसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे यावर टिप्पणी केली आहे.