Mumbai Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका तरुणाचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा तरुण चक्क मुंबईच्या रेल्वे स्थानकावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. रेल्वे स्थानकावर यापूर्वीही असे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; पण हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल, एक तरुण हाफ पॅंट, लाल टी-शर्ट आणि चष्मा घालून नाचताना दिसत आहे. त्याच्या अवती भोवती लोकं जमलेले आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक लोकल ट्रेनसुद्धा तेथूनच जात आहे. लोकलमधील लोकं या तरुणाचा डान्स पाहून हसताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
हा तरुण हसतमुखाने भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तरुणाचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या या तरुणाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : श्रीकृष्णाकडून शिका ‘या’ पाच गोष्टी; जाणून घ्या आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र
aamchi_mumbai या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजर्सनी लिहिलेय, ” भावाला कोकण कन्याची कन्फर्म तिकीट मिळाली वाटतं.” तर एका युजरने लिहिलेय, “भावाची गणपतीची सुट्टी मंजूर झाली वाटतं.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला पण स्टेशनवर आयुष्यात एकदा असाच डान्स करायचा आहे.”