यंदा आयपीएल जिंकल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर CSK आणि धोनीवर अनेक पोस्ट, मीम्स, व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या मुंबई पोलिसांची इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या अ‍ॅक्शनची तुलना धोनीसोबत केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलीस यांनी इन्स्टाग्रामवर एक मीम्सचा फोटो शेअर केला आहे. या मीम्समध्ये मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा अ‍ॅक्शन टाइम आणि धोनीच्या रिअ‍ॅक्शन टाइम समान असल्याचे दाखवले आहे.

हेही वाचा : Viral Video : चालत्या स्कूटीवर चक्क दोन तरुणांचा रोमान्स; किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

या मीम्समध्ये एका फ्रेममध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये स्टम्पिंग करताना धोनी दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये वाहतूक नियमाचे उल्लंघन करताना एका कारचा फोटो आहे आणि त्याखाली लिहिले आहे की ट्रॅफिक पोलिसांचा अ‍ॅक्शन टाइम हा धोनीच्या रिअ‍ॅक्शन टाइमसारखाच आहे.

हेही वाचा : Bye शब्दाचा अर्थ माहितीये का? कुणालाही बाय बोलण्याआधी फुल फॉर्म जाणून घ्या

मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर हजारो लाइक्स आहेत आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai traffic police warning by using name of ms dhoni csk memes post goes viral on instagram social media ndj
First published on: 01-06-2023 at 12:17 IST