scorecardresearch

Premium

ढोलीडा ढोल बाजे…! अमृता फडणवीसांनाही आवरला नाही गरबा खेळण्याचा मोह; Video मुळे पुन्हा आल्या चर्चेत

Viral video: अमृता फडणवीस यांचे गरबा नृत्य पाहाच

Amruta Fadnavis Playing Garba video viral
ढोलीडा ढोल बाजे…! अमृता फडणवीसांनाही आवरला नाही गरबा खेळण्याचा मोह; Video मुळे पुन्हा आल्या चर्चेत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण, आता त्या आपल्या गरबा नृत्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सध्या देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने ठिकाणी गरब्याच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, नागपूरमध्येही अशाच एका गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. तिथे अमृता फडणवीस यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही. विविध गाण्यांवर त्या गरबा खेळण्यात दंग झाल्याच्या दिसल्या. त्यांच्या गरबा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीस यांनी रविवारी (२३ ऑक्टोबर) नागपूरमधील विविध नवरात्रोत्सव मंडळांना आवर्जून भेटी दिल्या. झुंजार नागरिक मंचातर्फे आयोजित रास गरबा उत्सवालाही त्या उपस्थित राहिल्या. तिथे अमृता फडणवीस यांना गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस गरबा खेळण्यात दंग झाल्याचे दिसत आहे. नागपूरमधील गरबा कार्यक्रमानिमित्त अमृता फडणवीस यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. गरब्याच्या विविध गाण्यांवर त्यांनी काही तरुणी, महिलांसह गरबा खेळण्याचा अगदी मनमुराद आनंद लुटला. यावेळी सहभागी झालेल्या तरुणी, महिलांसह अमृता फडणवीस याही गरबा खेळण्यात सहभागी झाल्याने सर्वांनाच आनंद झाला.

rajan vichare eknath shinde anand dighe birth anniversary shivsena thane
आनंद दिघे हेच गद्दारांना त्यांची जागा दाखवतील ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची शिंदे गटावर टीका
marathon, medical tests, running, precautions, Health, marathi news,
Health Special: मॅरेथॉन धावताय? तर या टेस्ट केल्या आहेत का? (भाग १)
ulta chashma
उलटा चष्मा: त्रिकुटाने अयोध्यावारी
former minister mla ravindra waikar absent from ed inquiry
माजी मंत्री रवींद्र वायकर चौकशीला अनुपस्थित

अमृता फडणवीस यांचा गरबा नृत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी त्यांच्या गरबा नृत्याच्या व्हिडीओवर विविध कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, राज्यभरात विविध गरबा कार्यक्रमांना लोकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यात अनेक राजकीय नेतेमंडळीही गरबा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावत गरबा खेळण्याचा आनंद घेत आहेत. अनेक राजकीय पक्षांकडूनही विविध गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navratri 2023 garba dance of maharashtra deputy cm devendra fadnavis wife amruta surfaced also worshiped maa durga 2023 watch viral video sjr

First published on: 23-10-2023 at 13:35 IST

संबंधित बातम्या

×