Polish Woman Claims Man Followed Her : अनेक परदेशी लोक भारतीय संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भारतात येत असतात. अनेक इन्फ्युएन्सर किंवा कॉन्टेट क्रिएटर देखील भारतात आवर्जून येतात. भारतातील खाद्यसंस्कृती, रहाणीमान, परंपरा अशा अनेक गोष्टी त्यांना भुरळ घालतात. भारतात येणार्‍या या परदेशी पाहुण्यांचे अनेक लोक आनंदाने स्वागत करतात, त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देतात पण अनेकदा काही लोक त्यांच्याशी गैर वर्तन करताना दिसतात. अशा घटनांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

परदेशी महिलेला भारतात आला धक्कादायक अनुभव

ऑनलाइन प्रवासाचे अनुभव नोंदवण्यासाठी प्रसिद्ध असलेली पोलिश कंटेंट क्रिएटर कासिया तिच्या गेस्ट हाऊसमधून डोंगरावरून खाली जात असताना तो माणूस तिच्याकडे आला आणि फोटो काढण्याची मागणी केली. सुरुवातीला तिला वाटले की, तो तिला त्याचा फोटो काढण्यास सांगत आहे. पण लवकरच तिला कळले की त्याची एक वेगळीच विनंती आहे. तो तिच्याबरोबर फोटो काढू इच्छितो. जे तिला अजिबात आवडले नाही. तिने त्याला नम्रपणे नकार दिला आणि म्हटले की, ती गप्पा मारण्याच्या किंवा फोटो काढण्याच्या मूडमध्ये नाही. “भारतात इतका वेळ घालवल्यानंतर आणि अनोळखी लोकांबरोबर घेतलेल्या इतक्या सेल्फींनंतर, ज्यामध्ये छोट्या गप्पा मारल्या गेल्या आहेत, मला आता हे करायचे नाही असे वाटत आहे,” तिने कॅप्शनमध्ये लिहिले.

फोटोसाठी नकार देता परदेशी महिलेचा पाठलाग करत होता पुरुष

पण त्या व्यक्ती तिचा नकार लक्षात न घेता वारंवार तिला फोटो घेण्याची मागणी करत होता. कासियाने सांगितले की तो तिच्या मागे जात राहिला आणि हिंदीमध्ये तिच्यावर ओरडला देखील. तिने आपण संकटात सापडल्यासारखे वाटल्याने तिने सर्व संवाद मोबाईवर रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये, ती असे म्हणताना ऐकू येते की, “मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा नाही. तुम्ही माझ्या मागे येणे थांबवा. मला हे आवडत नाही.” ज्या क्षणी त्याने कॅमेरा पाहिला, तो नजर हटवून निघून गेला.

परदेशी महिलेने शेअर केला धक्कादायक अनुभव

कासियाने नंतर व्हिडिओमध्ये तिचे विचार शेअर केले आणि म्हटले की, तिला खूप अस्वस्थ वाटत आहे. “मी प्राणीसंग्रहालयात पाहण्यासारखा आणि फोटो काढण्यासाठी प्राणी नाही. ते खूप अस्वस्थ आहे. काही भारतीय पुरुषांनो, इतके विचित्र वागू नका. आम्हा परदेशी महिलांना मांस असल्यासारखे वाटू इच्छित नाही. आमच्याकडे विचित्रपणे पाहिल्याने आम्हाला तुमच्याशी बोलायची इच्छा होणार नाही. मी वस्तू नाही. मी जशी आहे तशीच मला राहू द्या.”

व्हिडीओवरही आशय लिहिलेला दिसत आहे ज्यामध्ये पुरुषांना उद्देशून म्हटले आहे की, या विचित्र पुरुषासारखे वागू नका, जंगलात एकट्या महिलेचा पाठलाग करणे सहन केले जाणार नाही, नाहीचा अर्थ नाहीच असतो(NO Means NO)”

Polish woman viral video,
कासियाची पोस्ट (सौजन्य – jenesaisquoi_X/instagram)

व्हिडिओमधील कमेंट बंद केल्या गेल्या असल्या तरी, कासियाने पुन्हा एका वेगळ्या पोस्टमध्ये या घटनेवर भाष्य केले. तिने स्पष्ट केले की, अनुभव असूनही ती एकट्याने प्रवास करणे थांबवणार नाही. “एक म्हण आहे की, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर(भारत नवशिक्यांसाठी नाही.) माझा हेतू महिलांना घाबरवण्याचा किंवा संपूर्ण देशाचे नाव खराब करण्याचा नव्हता. माझा हेतू पुरुषांनी काय करू नये याचे उदाहरण दाखवणे आणि जागरूकता निर्माण करणे हा होता. तुम्ही भारतीय, क्रोएशियन किंवा ब्रिटिश असलात तरी काही फरक पडत नाही.”

येथे पाहा Viral Video

https://www.instagram.com/p/DJWgAi_SOCP

तिने पुढे म्हटले की, व्हिडिओ पोस्ट करायचा की नाही यावर तिने चर्चा केली होती, परंतु शेवटी असे करण्याचा निर्णय घेतला कारण त्याबद्दल बोलणे महत्त्वाचे होते: “जर आपण या समस्येवर लक्ष केंद्रित केले नाही आणि त्याबद्दल बोललो नाही तर काहीही बदलणार नाही.”

कासियाच्या अनुभवामुळे महिलांना, विशेषतः परदेशी पर्यटकांना, दुर्गम भागात कसे वागवले जाते याबद्दल चिंता निर्माण झाली.

Live Updates