Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात.सध्या असाच एक वृद्ध व्यक्तीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अप्रतिम डान्स करताना ते व्हिडीओत दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काका पायांची मांडी घालून शरीर दोन हातावर उचलत आहे. काकांची कसरत पाहून सुरुवातीला तुम्ही थक्क व्हाल त्यानंतर हे वृद्ध काका मनसोक्त नाचताना दिसत आहे. नाचताना मध्ये मध्ये ते शिट्ट्या सुद्धा वाजवत आहे. काकांच्या डान्स स्टेप्स आणि ऊर्जा पाहून तुम्हीही भारावून जाल.
हा व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. काकांच्या आजुबाजूला त्यांचा डान्स बघण्यासाठी गर्दी जमलेली आहे. अनेक महिला पुरुष खूर्चीवर बसून त्यांचा डान्स बघताना दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Saree Hacks : रबर बँडच्या मदतीने करा परफेरक्ट साडीच्या निऱ्या; अनोखा जुगाड, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dhaval_panchal23 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,अतिशय ऊर्जा असणाऱ्या वृद्ध व्यक्तीविषयी खरंच खूप आदर वाटतो” व्हिडीओ पाहून युजर्सनी काकांचे कौतुक केले आहे.