PM Modi Drive Car In Europe: पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या साहसाची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते. कधी बेअर ग्रिल्ससह मॅन vs वाईल्डमध्ये तर कधी चित्त्यांना जंगलात सोडायला जाताना मोदींनी आपल्या हटके अंदाजाने मोठा चाहतेवर्ग जोडून ठेवला आहे. यावेळेस मोदी चक्क युरोपमधील रस्त्यावर कार चालवताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी हा फोटो शेअर केला आहे.

१ ऑक्टोबर २०२२ ला देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवा लाँच केल्या, दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित प्रदर्शनात मोदींच्या हस्ते 5G प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ओडिशामधील गावात 5G ची लाईव्ह चाचणी पार पडली. याच सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे बसून युरोपच्या स्वीडन या देशात कार चालवली. 5G तंत्रज्ञांच्या बळावर हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधानांनी दिल्लीत मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार चालवली होती.

केंद्रीय मंत्री, पीयूष गोयल यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकता की रिमोट कंट्रोल प्रमाणे मोदींच्या हातात गाडीचे स्टियरिंग आहे.

PM मोदींचा ‘काला चष्मा’ होतोय Viral; 5G लाँच करताना वापरलेली Jio Glass चे भन्नाट फीचर पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा पंतप्रधान मोदी युरोपात कार चालवतात…

5G सेवा लाँच करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा सुपुत्र आकाश अंबानी याने उपकरणांविषयी व 5G तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. सध्या 5G देशातील प्रमुख १३ शहरांमध्ये सुरु करण्यात आले आहे तर २०२४ पर्यंत संपूर्ण देशभरात 5G नेटवर्क पाहायला मिळेल असे धोरण तयार असल्याचे केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.