Pune Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, जुनी ठिकाणे बघण्यास लोक गर्दी करतात. येथील खाद्यसंस्कृती सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. पुण्यात असे काही ठिकाणे आहे, जे तेथील खाद्यपदार्थासाठी ओळखले जाते. तुम्ही कधी पुण्यातील १३५ वर्ष जुन्या वाड्यातील वडापाव खाल्ला आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या वडापाविषयी माहिती सांगितली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक वाडा दिसेल. या वाड्याच्या बाहेर ‘गरमा गरम वडापाव’ अशी पाटी लावली आहे. पुढे व्हिडीओमध्ये या वाड्यातील आतला रस्ता रस्ता दाखवला आहे. या वाड्यात शिरल्यानंतर अगदी समोर तुम्हाला एक वडापावचे दुकान दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक वडापाव विक्रेता महिला दिसेल जी बटाटा कुस्करताना दिसते. त्यानंतर ती गरमा गरम तेलातून हिरवी मिरची तळताना दिसते. त्यानंतर ती गरमा गरम वडापाव तेलातून काढते आणि सर्व्ह करते. हा वडापाव पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.

हेही वाचा : “शेवटी पेराल तेच उगवणार” लहान मुलांच्या एका कृतीनं जिंकली लाखो लोकांची मनं; VIDEO पाहून कळेल संस्कार किती महत्त्वाचे

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा वाडा नेमका कुठे आहे? तर हा वाडा नारायण पेठमध्ये आहे आणि वाड्यात हा गरमा गरम वडापाव मिळतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “१३५ वर्ष जुन्या वाड्यातील वडापाव, नारायण पेठ पुणे”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

sid__foodie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गरमा गरम वडापाव, नारायण पेठ पुणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर वडापाव असतो” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यातील सर्वात बेस्ट वडापाव.. गरमा गरम वडापाव खायचा असेल तर आवर्जून येथे जा…”

हेही वाचा : “देवा अशी गरिबी नको रे कोणाला!” खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा खांद्यावर जबाबदारीचं ओझं; Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सुद्धा पुण्यातील अनेक ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. कधी पुण्यातील लोकप्रिय मिसळ, तर कधी लोकप्रिय कांदे पोहे, कधी लोकप्रिय भेळ तर कधी लोकप्रिय साबुदाणा खिचडीचे व्हिडीओ चर्चेत येतात. विशेष म्हणजे पुण्यात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात.