Pune Video Viral : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा इतिहास या शहराची ओळख सांगतो. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे अतिशय लोकप्रिय आहे. पुण्यात असे अनेक ठिकाणे आहेत जे बघायला लोक दुरवरून येतात. तुम्ही पुण्यातील वाघेश्वर महाराज मंदिर पाहिले का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील सुंदर वाघेश्वर मंदिर आणि या मंदिराचा आजुबाजूचा परिसर दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video do you know the Mahadev temple in pune wagheshwar mandir charholi video goes viral)

हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

पुण्यातील महादेवाचे हे सुंदर मंदिर पाहिले का? (Pune video : do you know the Mahadev temple in pune wagheshwar mandir)

या व्हायरल व्हिडीओमध्ये वाघेश्वर मंदिराचा सुंदर परिसर दाखवला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला शंकर पार्वती आणि गणपतीचा सुंदर देखावा दिसेल. त्यानंतर तुम्हाला महादेवाचे सुंदर मंदिर दिसेल. मंदिरावर ‘ओम नम: शिवाय’असे लाल अक्षरात लिहिलेय. पुढे व्हिडीओत मंदिराच्या आजुबाजूचा परिसर दाखवला आहे. तसेच मंदिरातील आतील भाग सुद्धा दाखवला आहे. व्हिडीओत तुम्हाला काळ्या दगडात कोरलेली शिवलिंग दिसेल. या मंदिरावर भरीव नक्षीकाम केले आहे. हे मंदिर अतिशय आकर्षक असून दिसायला खूप सुंदर आहे.

हेही वाचा : “जबाबदारी अशी गोष्ट आहे की…”, ट्रक चालकाचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pune_peace या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वाघेश्वर महाराज मंदिर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चर्होली मध्ये आहे हे मंदिर.. खूप मस्त आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हे माझ्या माहेरचं मंदिर आहे चर्होली मधलं” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह.. काय सुंदर मंदिर आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी “हर हर महादेव” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.