Pune Viral Video : पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून पोट भरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून संताप येतो. पुण्यातील गमती जमती किंवा चांगले वाईट अनुभव लोक सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला रस्त्याच्या मधोमध तुफान भांडताना दिसत आहे तर एक तरुण हॉर्न वाजवताना दिसत आहे. या तरुणाने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पुण्यातील भांडणाचे तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन महिला स्कुटीवर बसून भररस्त्यात भांडण करताना दिसत आहे. एक महिलेच्या स्कुटीवर छोटा चिमुकला डबल सीट बसलेला दिसत आहे. रस्त्यावरील लोक हॉर्न वाजवताना दिसत आहे. या दोन महिला एवढ्या तीव्रपणे भांडण करताना दिसत आहे की त्या हॉर्नच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्ता सुद्धा देत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
श्रावण भुजबळ नावाच्या तरुणाने shra1bhujbal या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरू हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिनांक ०३/०४/२०२५ रोजी, स्थळ पुणे चिंचेची तालीम, डाव्या बाजूवाल्या काकू चिंचेच्या तालीम जवळील गणपतीच्या पाया पडायचे म्हणून अचानक ब्रेक दाबला तर मागून उजव्या साईड वाल्या काकू येऊन त्यांना धडकल्या. जरी चूक डाव्या साईड वाल्या काकूंची होती तरी त्यांचा असं म्हणणं होतं उजव्या साईडवाल्या काकूंनी त्यांची माफी मागावी दोघी दहा मिनिटे रस्त्यावर तशाच भांडत बसल्या होत्या. उजव्या बाजूवाल्या काकू पुढे निघून गेल्या डाव्या साईड वाल्या काकू म्हणाल्या काय बावळट बाई आहे. पुन्हा दोघी दहा मिनिटे पुन्हा रस्त्यावर भांडत बसल्या त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक खूप झाले. रस्त्यावरील सर्व लोक दोघींना पाहून एन्जॉय करत होती. मी हॉर्न वाजवून थकलो तरी दोघी बाजूला सरकल्या नाही.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नळावरचे भांडण गाडीवर झाले” तर एका युजरने लिहिलेय, “त्यांना डिस्टर्ब करू नको” आणखी एका युजरने लिहिलेय, “महत्त्वाचा विषय सुरू आहे, हॉर्न वाजवू नका” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.