लोकसभा निवडणुकींच्या निकालांचे स्वागत भाजपा समर्थकांनी मोठ्या उत्साहात केले. फिर एक बार मोदी सरकार या भाजापच्या घोषणेनुसार नरेंद्र मोदीच दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सज्ज झाले आहेत. असे असतानाच पंजाबमधील एका व्यक्तीला मात्र या निवडणुकांच्या निकालानंतर आश्रू आवरणे कठीण झाले आहे. पंजाबमधील जालंदर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवणाऱ्या नितू सुतरन वाला यांना केवळ पाचच मते मिळाली आहेत. कमी मत मिळाल्याच्या दु:खापेक्षा नितू यांना कुटुंबात ९ जण असतानाही आपल्याला केवळ पाचच मिते मिळाल्याचे अधिक दु:ख झाले आहे. आपल्या कुटुंबानेच आपल्याला मत दिले नाही हा धक्का नितू यांना पचवणे कठीण झाले अन् कॅमेरासमोरच त्यांना रडू कोसळले.

निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर एका पत्रकाराने नितू यांची मुलाखत घेतली. यामध्ये नितू यांनी त्यांच्या कुटुंबाला आणि इव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप केला. या आरोपानंतर पत्रकाराने नितू यांना ‘तुमचे कुटुंबियच तुम्हाला पाठिंबा देत नाहीत तर बाहेरील लोक तुम्हाला कसा पाठिंबा देणार?’ असा थेट सवाल केला. हा प्रश्न ऐकून नितू यांना रडू कोसळले. या निकालाचा आपल्याला धक्का बसला असून यापुढे कधीच कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं नितू यांनी सांगितले आहे.

एकीकडे नितू यांना दु:ख आवरणे कठीण झालेले असतानाच दुसरीकडे ट्विटवर मात्र या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी नितू यांची खिल्ली उडवली आहे.

घरचे लोक नऊ आणि मते पाच

कुठून येतात असे लोक

जगावरचा विश्वास उडाला

अब नही रहना

पुढच्या वेळेस याच्या प्रचाराला मी जाणार

अनेकांनी ट्विट करुन मतमोजणीच्या शेवटी नितू यांना ८५६ मते मिळाल्याचे म्हटले आहे. निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवरही नितू यांना ८५६ मते मिळाल्याचे दिसत आहे. जालंदर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या १९ उमेदवारांच्या यादीमध्ये नितू तळाकडून चौथ्या क्रमांकावर आहेत.