IPS officer Manoj Sharma Viral Post : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. पण, ज्या क्षणी व्यक्ती यशस्वी होते त्या क्षणी तिला एकदा तरी शाळेची आठवण येते. अशा वेळी शाळेतील शिक्षकांना भेटावे, त्यांना आपल्या आयुष्यातील या आनंदी क्षणाची माहिती द्यावी, असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे शाळेबरोबर प्रत्येकाचे एक जिव्हाळ्याचे नाते असते. एखादा विद्यार्थी शिकून भविष्यात पुढे यशस्वी झाला की, शाळेसाठी तो गौरवाचा क्षण असतो. असाच गौरवाचा क्षण १२ वी नापास होऊनही आयपीएस अधिकारी झालेल्या मनोज शर्मा यांना अनुभवता आला. ज्या शाळेने घडवले, मोठे केले, त्याच शाळेन त्यांचा असा सन्मान दिला; जो ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत. आयपीएस मनोज शर्मा यांनी त्यांच्या गावातील शाळेने केलेल्या सन्मानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आयपीएस मनोज शर्मा यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत त्यांच्या शाळेचे प्रवेशद्वार दिसतेय; तर दुसऱ्या फोटोत शाळेच्या बाहेरील भिंत दिसतेय. त्यावर त्यांच्या सन्मानार्थ काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. IPS मनोज शर्मा यांच्या सन्मानार्थ शाळेच्या भिंतीवर लिहिले आहे की, तुम्ही सर्वांसाठी आदर्श आहात. तुम्ही आम्हाला प्रेरणा देता की कठोर परिश्रम आणि समर्पणाने मोठी उद्दिष्टेही साध्य करता येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोसह आयपीएस अधिकरी मनोज शर्मा यांनी लिहिले, “तुमचे नाव जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लिहिले जाऊ शकते. परंतु, सर्वांत मोठा आनंद तेव्हाच होतो जेव्हा तुमच्या गावातील शाळेच्या भिंतीवर तुमच्यासाठी काहीतरी चांगले लिहिले जाते.” त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक जण वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले – तुम्ही या सन्मानास पात्र आहात. दुसऱ्या युजरने लिहिले – हा अभिमान खूप मोठा आहे भाऊ. आणखी एका युजरने लिहिले- सर, तुम्ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणास्रोत आहात.