Russia-Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता एक आठवडा उलटून गेला आहे. यादरम्यान दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. युद्धाशी संबंधित काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. आता या व्हिडीओमध्ये किती सत्य आहे आणि किती खोटे आहे हे तिथे उपस्थित असलेले लोकच सांगू शकतील. असाच एक परंतु धक्कादायक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

युक्रेनच्या शेतकऱ्यांनी पेटवलेली रशियन क्षेपणास्त्र यंत्रणा व्हिडीओमध्ये दिसत आहे. कोट्यवधी डॉलर्स खर्चून बनवलेल्या या क्षेपणास्त्र यंत्रणेला आग लावली आहे. रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनचे नागरिकही सहभागी झाले असून ते आपले शौर्य दाखवण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर करत आहेत.

(हे ही वाचा: Viral Photo: ओळखा पाहू; हा फोटो भारतातील कोणत्या राज्यातील आहे?)

डेली स्टारच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या नागरिकांचा दावा आहे की रशियन सैनिक त्यांच्या भूमीतून पळून जात आहेत आणि तेव्हा त्यांनी ही टाकी सोडली. हा व्हिडीओ दक्षिण युक्रेनमधील बश्टांका शहराचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ १ मार्चचा आहे, ज्यामध्ये एक शेतकरी टाकीला आग लावताना दिसत आहे. डनिप्रो शहराचे महापौर बोरिस फिलाटोव्ह यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पेटसीर-सी क्षेपणास्त्र प्रणालीने जळणारी टाकी जाळल्याचा दावा करण्यात आला आहे.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)

(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टँकची किंमत होती USD $15 दशलक्ष

त्यांनी दावा केला आहे की स्फोट झालेल्या क्षेपणास्त्र प्रणालीची किंमत US$15 दशलक्ष होती. पँटसिर-सी क्षेपणास्त्र प्रणाली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र आणि विमानविरोधी प्रणालीने सुसज्ज आहे, जी रशियाच्या केबीपी इन्स्ट्रुमेंट डिझाइन ब्युरोने बनविली आहे. ही यंत्रणा जमिनीवरून हवेत मारा करू शकते आणि युद्ध विमानांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करून युक्रेनच्या लोकांना प्रोत्साहनही दिले आहे.