Saree Hacks : साडी हा लोकप्रिय पेहराव मानला जातो. शतकानुशतके महिला साडी नेसतात. भारतात साड्यांना विशेष महत्त्व आहे. लहान मुलींपासून ते वयोवृ्द्ध स्त्रियांपर्यंत आवडीने साडी नेसली जाते पण काही लोकांनी नीट साडी कशी नेसावी हे अजूनही कळत नाही. काही लोकांना साडी नेसायला जमते पण साडीच्या निऱ्या व्यवस्थित कशा कराव्यात, हे समजत नाही पण आज आपण साडीच्या निऱ्या व्यवस्थित आणि नीट करण्यासाठी एक खास टीप जाणून घेणार आहोत.

रबर बँडच्या मदतीने करा साडीच्या व्यवस्थित निऱ्या

सोशल मीडियावर साडी कशी नेसावी, याबाबत असंख्य टिप्स देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक खास टीप सांगितलेली आहे. या टिपच्या मदतीने तुम्ही साडीच्या व्यवस्थित निऱ्या करू शकता.
या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त एका रबर बँडच्या मदतीने परफेक्ट साडी नेसू शकता. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे पण हे खरं आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक महिला साडीच्या निऱ्या करताना दिसत आहे. त्यासाठी ती निऱ्यासाठी सोडलेल्या एका साडीच्या भागाला रबर बँड बांधते आणि दुसऱ्या बाजूने नीट निऱ्या करते. व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका छोट्या रबर बँडच्या मदतीने कशी व्यवस्थित साडी नेसली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

tiruchengode_sareedrapist_ishu या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रबर बँडच्या मदतीने सोप्या पद्धतीने बनवा साडीच्या निऱ्या”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान टीप आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान” या महिलांना ही टीप आवडली आहे.