सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण अनेकदा त्या व्हिडीओची पडताळणी न करताच तो खरा आहे हे समजून शेअर करत असतो. पण हल्ली अनेक व्हिडीओ खोट्या दाव्यांसह व्हायरल होत असतात, किंवा एआयच्या माध्यमातून बनवले असतात. या खोट्या व्हिडीओमुळे आपली दिशाभूल तर होतेच पण चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यात इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना धमकावल्याचा आरोप असलेल्या काही लोकांना पोलीस मारहाण करताना दिसत आहेत.
आम्ही तपास केला असता, हा व्हिडिओ एका चित्रपटाच्या चित्रीकरणातील असल्याचे समोर आले असून, सोबतचा दावा दिशाभूल करणारा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स वापरकर्ता हमजा शोएबने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे.
इतर वापरकर्तेही हाच व्हिडिओ अशाच दाव्यासह शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडिओमधून मिळालेल्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
आम्हाला ‘Rkp the loser’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला एक छोटा व्हिडिओ आढळला. वापरकर्त्याने वर्णनात नमूद केले होते की हा व्हिडिओ एका चित्रपटाच्या चित्रीकरणातील आहे.
आम्हाला हाच व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वी ‘Kannada Picchar’ या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आढळला.
त्याच्या वर्णनात असे लिहिले होते (अनुवाद): Deadly Soma 2 क्लायमॅक्स शूट सिटी मार्केटमध्ये | deadlysoma 2 मूवी शूटिंग व्हिडिओ | #shorts
आम्हाला इतर यूट्यूब चॅनलवरही या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे आणखी व्हिडिओ आढळले.
kannada.news18.com नुसार, ‘डेडली सोमा’ हा दिग्दर्शक रवी श्रीवत्स यांनी बनवलेला चित्रपट आहे आणि ते त्याचा पुढील भाग घेऊन येणार आहेत. ‘डेडली सोमा’ मूळतः २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता.
https://kannada.news18.com/news/entertainment/sandalwood-deadly-soma-part-2-movie-shooting-latest-updates-rvj-yda-2053537.html
निष्कर्ष: कन्नड चित्रपटातील एका दृश्याच्या चित्रीकरणाचे दृश्य, पोलीस इन्स्टाग्राम ट्रोलर्सना मारहाण करत असल्याची वास्तविक घटना म्हणून व्हायरल होत आहे. त्यामुळे, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.