Train Accident Shocking Video: ट्रेनमधून दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात. ठिकठिकाणाहून लोक वेगवेगळ्या शहरांत जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी ट्रेनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. काही जण अनेकदा ट्रेन सुटेल म्हणून लोक चालती ट्रेन पकडायला जातात आणि अपघात आपल्याच अंगाशी ओढून घेतात. तर काहीजण रीलच्या नादात संकट ओढावून घेतात. ट्रेनच्या अपघातांची मालिका न संपणारी आहे.
सोशल मीडियावर अनेकदा आपण अशा अपघातांचे व्हिडीओ पाहत असतो. या अपघातात कोणाला गंभीर दुखापत होते तर कोण मृत्यूच्या दारात जातं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला चक्क ट्रेनच्या खाली अडकली आहे. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…
ट्रेनखाली अडकली महिला (Woman Stuck under Train Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला ट्रेनखाली अडकलेली दिसत आहे. स्वत: ला वाचवण्यासाठी ती आतोनात प्रयत्न करत आहे. ट्रेनखाली अडकलेली महिला तिथून बाहेर येण्यासाठी रेंगाळत रेंगाळत जागा दिसेल तिथे जातेय. तिथून एक व्यक्ती तिला बाहेर काढण्यासाठी मदत करते. नशीबाने ही चालती ट्रेन नसून ट्रेन एकाच जागेवर थांबली आहे. व्हिडीओमध्ये तिला जास्त दुखापत झाली नसल्याची दिसून येतंय. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @bihari_lalit_7360 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर “अरे देवा, हे कोणाच्याही बाबतीत घडू देऊ नकोस” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Women Accident Video Reactions)
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पण ती खाली गेलीच कशी” तर दुसऱ्याने “सुदैवाने ती सुरक्षित आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “सगळे व्हिडीओ बनवत आहेत पण कोणी मदतीला जात नाही” तर एकाने “रीलसाठी चाललंय सगळं” अशी कमेंट केली. तर “आयुष्याचा असा खेळ करू नका” अशीदेखील कमेंट एकाने केली.