Shocking Video Icecream : आजकाल सगळ्यांना पॅकेज्ड फूड खाण्याची सवय झाली आहे. मग ते आईस्क्रिम असो वा चॉकलेट. घरी काही करण्यापेक्षा आयत बाहेरच पॅकेज्ड फूड खाण्यास लोक प्राधान्य देतात. पण हे पदार्थ नेमके कसे पॅक केले जातात हे कोणालाच ठाऊक नसतं. तरी त्यावर आंधळा विश्वास ठेवून आपण बाहेरून विकत घेऊन पदार्थ खातो. पण आजकाल असे पदार्थ खाण्याआधीही १०० वेळा विचार केला पाहिजे.
सोशल मीडियावर दररोज अशा भेसळयुक्त पदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या सोशल मीडियावर एक असा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक माणूस आईस्क्रिमचं पॅकिंग करताना खूप घाणेर्ड कृत्य करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Ice-cream Packaging Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये एक तरुण आईस्क्रिम कॅंडिचं पॅकिंग करताना दिसत आहे. पण आईस्क्रिम प्लास्टिक बॅगमध्ये पॅक करण्याआधी तो ती कॅंडी चोखून पाहत आहे आणि त्यानंतर तिच कॅंडी तो पॅक करत आहे. हे घाणेर्ड कृत्य करताना तो कॅमेरात कैद झाला असून त्याला याचा अजिबात पश्चाताप नसल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @delhi.news21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आईस्क्रीम विक्रेत्याचे विकृत कृत्य आले समोर” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.४ मिलियन व्हयुज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आले नाही.
युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “याला लगेच अटक करा” तर दुसऱ्याने “अशा लोकांना चपलेने मारलं पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकाने “तुमच्यासारख्या लोकांमुळे जग देशावर हसते.” अशी कमेंट केली. “अशा लोकांना काम नाही दिलं पाहिजे” असं एकजण कमेंट करत म्हणाला.