Viral video: जगात अनेक प्रकारचे अॅडव्हेंचर्स स्पॉट्स आहेत. त्यामध्ये धबधब्यांचाही समावेश आहे. निसर्गानं हे अतिशय विलोभनीय असे देखावे निर्माण केले आहेत. काही ठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे लोकांना भुरळ घालतात. मात्र, याच ठिकाणी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्राणी बाहेर येत असतात. त्यात सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते सापांचं. याच काळात साप जमिनीतून बाहेर येतात. कारण- जमीन थंड झालेली असते. त्यामुळे अशा ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. दरम्यान, अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. त्या सापाचं नाव ऐकूनच धडकी भरते. हाच साप जर एखाद्याच्या पँटमध्ये शिरला, तर काय होईल याचा विचार करा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच हादरून जाल.

पावसाळ्यात मजा-मस्ती करण्यासाठी अनेक लोक धबधबे किंवा धरणाच्या ठिकाणी भेट देतात. पण, अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की, पावसाळ्यात फिरायला गेल्यावर सतर्क राहणं आवश्यक आहे.

तरुणाच्या पँटमध्ये शिरला साप

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली काही तरुण मजा-मस्ती करताना दिसत आहेत. काही पर्यटक धबधब्याखाली अंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावेळी धबधब्यात पोहताना अचानक एका तरुणाच्या पँटीत साप शिरतो. पाण्यात पोहताना पँटीत साप शिरल्याचं कळताच तरुण पाण्याबाहेर आला. त्याच्या मित्रांनी हा साप पाहिला. या तरुणानं पँटीत शिरलेल्या सापाचं डोकं दाबून धरलं. मग पँटीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले. सापाला पाहून त्याच्यासहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते. मात्र, ते मित्राचा जीव वाचण्यासाठी सापाला पँटमधून बाहेर खेचत होते. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या मित्रानं जोर लावून साप पँटीच्या बाहेर खेचला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पैठणीच्या खेळात वहिनी स्टेजवरच भिडल्या; भांडणाचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ suratmemecentral नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा नेमका कुठला व्हिडीओ ते कळू शकलेलं नाही.

महाराष्ट्रात दोन दुर्घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महाराष्ट्रात नुकत्याच दोन दुर्घटना घडल्या. पहिल्या दुर्घटनेत रविवारी लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. तर, आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणानं धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला.