VIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…

हवाई सुंदरी म्हटलं की, आपल्या समोर येतात विमानात आदरातिथ्य करणाऱ्या सुंदर तरूणी…कामातून मोकळा वेळ काढत याच सुंदर हवाई सुंदरींच्या वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशाच एका सुंदर हवाई सुंदरीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

air-hostess-dance-video-viral
(Photo: Instagram/ yamtha.uma)

हवाई सुंदरी म्हटलं की, आपल्या समोर येतात विमानात आदरातिथ्य करणाऱ्या सुंदर तरूणी…मात्र त्यांच्या या कामाच्या व्यापात त्यांना कधीतरी विरंगुळा म्हणूनही डान्सही करावासा वाटू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हवाई सुंदरींच्या वेगवेगळ्या डान्सच्या व्हिडीओंचा जणू ट्रेंडच आला आहे. अनेक हवाई सुंदरी त्यांच्या कामातून वेळ काढत कधी विमानतळावर तर कधी विमानात डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. स्पाईसजेट कंपनीच्या एका एअर होस्टेसने श्रीलंकन गाणं ‘मनिके मागे हिथे’ या गाण्यावर केलेला डान्स प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर याच एअर होस्टेसने ‘नवराई माझी लाडाची….’ गाण्यावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. नुकतंच या व्हायरल झालेल्या हवाई सुंदरीचा आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. एकदा हा व्हिडीओ पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधल्या हवाई सुंदरीचं नाव उमा मिनाक्षी असं आहे. यापूर्वी तिचे बरेच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतंच तिने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या Lazy Lad या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. या व्हिडीओमधील एअर होस्टेसचे डान्स मूव्हस पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये ती लेझी लॅड डान्स चॅलेंजचा मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहे.

इन्स्टाग्रामवर सध्या लेझी लॅड गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. तुम्ही इन्स्टाग्रामचे युजर्स असाल तर आतापर्यंत सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे रिल्स तुम्ही बघितले असतील. इन्स्टाग्रामवर लेडी लॅड गाण्याचं चॅलेंज स्वीकारत सेलिब्रिटींसह सामान्य नेटकरी थिकरताना दिसत आहेत. विद्या बालन आणि इमरान हाश्मी यांची भूमिका असलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील ‘लेझी लॅड’ हे गाणं आहे. या गाण्यावर विचित्र स्टेप्स करताना नेटकरी दिसत आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर लेझी लॅड गाण्याचं डान्स चॅलेंज स्वीकारत मजेदार आणि विचित्र स्टेप्स करताहेत.

अशात विमानात डान्स करत व्हायरल झालेली एअर होस्टेस तरी कशी मागे राहिल? स्पाईसजेट कंपनीची एअर होस्टेस उमा मिनाक्षी हिने सुद्धा या लेझी लॅड डान्स चॅलेंजमध्ये उडी घेतलीय. यात तिने थेट विमानतळावरच ठेका धरला. तिच्या चेहऱ्यावरील हवाभावाची खूप चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एअर होस्टेसच्या ड्रेसमध्येच थिरकताना दिसून येतेय.

आणखी वाचा : VIRAL : सॉक्स सुकवण्यासाठी न्यूझीलंड टीमने शोधला हा देसी जुगाड ! फोटो झाला व्हायरल

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : झिंगाट गाण्यावर फॉरेनर्स झाले ‘सैराट’; एकदा हा VIRAL VIDEO पाहाच…

एअर होस्टेस उमा मिनाक्षी हिने स्वतः तिच्या yamtha.uma नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत ५७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या डान्स व्हिडीओला लाईक केलंय. तर अनेक युजर्सनी तर या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शनमध्ये तिच्या डान्सचं कौतुक करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Spicejet air hostess dances to lazy lad at airport in viral video amazing says internet google trending video today prp

ताज्या बातम्या