Viral Video : शाळा हा प्रत्येकाची आयुष्यातील सुंदर काळ आहे. सोशल मीडियावर शाळेचे, विद्यार्थी आणि शिक्षकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा शाळेची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थी गुरुजींना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाचं सरप्राइज देताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल काही लोकांना त्यांच्या शाळेची किंवा गुरूजींची आठवण येऊ शकते.

हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील वर्गखोलीतला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही विद्यार्थी एका ठिकाणी गोळा होऊन भांडण असतात. अचानक वर्गात शिक्षक येतात आणि धावत त्या विद्यार्थ्यांकडे जातात आणि भांडण सोडवण्यासाठी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी जसे बाजूला होतात, तसा एक विद्यार्थी पुष्पगुच्छ घेऊन सरांसमोर येतो आणि हॅप्पी बर्थडे म्हणतो आणि भांडण करणारे विद्यार्थी सुद्धा जोर जोराने हॅप्पी बर्थडे सर म्हणतात. तेव्हा सरांना समजते की हे विद्यार्थी भांडण करत नव्हते तर त्यांना सरप्राईज देत होते. सर पण विद्यार्थ्यांचे सपप्राइज पाहून थक्क होतात. त्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्र येतात आणि सरांना केक कापायला सांगतात आणि उत्साहाने सरांचा वाढदिवस साजरा करतात. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सरांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता.

हेही वाचा : याला म्हणतात साधेपणा! नारायण मूर्तींनी लेकीसह घेतला आईस्क्रीम खाण्याचा आनंद, फोटो व्हायरल

class12drams या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रिय सुजन सर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सर. आम्हाला नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुम्ही आमचे कुटूंबाचा भाग वाटता. आम्ही तुमच्याकडून पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी शिकलो. आम्ही खोडी केली पण तुम्ही ज्याप्रकारे धावून आला त्यावरुन कळते की तुम्हाला प्रत्येकाची किती काळजी आहे. प्रेम आणि फुलासह हे पुष्पगुच्छ स्वीकारा – सेक्शन डी”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असे शिक्षक भेटणे, भाग्याची गोष्ट आहे. ” तर एका युजरने लिहिलेय, “शाळेचे दिवस आठवले” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान व्हिडीओ”