चीनमधील भयावह पूर परिस्थितीचे व्हिडिओ सकाळपासूनच सोशल मीडियावर शेअर होत आहेत.चीनमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थती निर्माण झाली आहे. पूर आणि विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच प्रमाणात  मनुष्यहानी सुद्धा झाली आहे. तर, जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. चीनच्या मध्य हेनान प्रांतात तब्बल एक हजार वर्षातील सगळ्यात मोठी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. बचाव कार्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ला तैनात करण्यात आलं आहे. कारण, झेंगझोऊ शहरात पूर परिस्थिती अधिक धोकादायक होत चालली आहे. एक मेट्रो स्टेशन संपूर्ण पाण्याखाली गेले असून, तेथील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.झेंगझोऊ येथील विमानतळावर येणारी व येथून जाणारी २६० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

सोशल मिडियावर व्हिडीओला पसंती

ऑस्टिन टेस्ला क्लब या ट्विटर अकाऊंटवरून या गाडीचा चीनच्या पुरातही चालत असलेल्या व्हिडीओ पोस्ट गेला गेला आहे. मूळचा हा व्हिडीओ कोडबेअर या नावाच्या युजरने शेअर केलेला आहे. यामध्ये टेस्ला मॉडेल ३ दिमाखात भरलेल्या पाण्यातून वाट काढत चालत आहे. ‘टेस्ला मॉडेल ३ आज चीन, हेनान प्रांतातील मोठ्या पूरातून मार्ग काढताना दिसली.’ असं कॅप्शन देत एलोन मस्कलाही  टॅग केलं आहे. सोबतच ‘शहरे पाण्याखाली आहेत, नदीकाठ फुटले आहेत.’ असं लिहित #chinaflood असा हॅशटॅगही दिला आहे. या १३ सेकेंदाच्या व्हिडीओला आतापर्यंत १.२ दशलक्ष लोकांनी बघितलं आहे. अनेकांनी खाली यावर केमेंटही केल्या आहेत. निकोल बूथमॅन-शेपर्ड नावाच्या एका युजरने “हे अत्यंत धोकादायक आहे  आणि पोस्ट करणेही बेजबाबदारपणाचे आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पूरात गाडी चालवण्यामुळे वाहून जाऊन मृत्यूही होऊ शकतो.”

या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सबवे, हॉटेल्स व सार्वजनिक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी सैन्य कामास लावलं आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी अशी अतिवृष्टी क्विचतच पाहायला मिळाली असल्याचे म्हटले आहे.