Mumbai thane rain video: मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. मध्यरात्रीपासून ते आतापर्यंत मुंबई आणि उपनगरात तब्बल ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. सर्वत्र धुवाधार पाऊस बरसत आहे. ठाणे जिल्ह्यातही रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने बदलापूर आणि सीएसएमटी दरम्यानच्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे फक्त ठाण्यापर्यंत लोकल चालवल्या जात आहेत.

ठाणे स्टेशनच्या गर्दीचा भयानक व्हिडीओ

आठवड्याच्या पहिल्याच दिशी ट्रेन बंद झाल्याने कामावर जाणं मुश्कील झालं आहे. ठाण्यापासून ते मुंबईपर्यंतच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. लोकलची वाट पाहत प्रवासी प्रचंड वैतागले होते. याच दरम्यानचा ठाणे स्थानकाच्या गर्दीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

महिलांच्या किंकाळ्या आणि आरडाओरडा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात चढण्यासाठी प्रचंड गर्दी दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी दिसत आहे की यामध्ये चेंगरा-चेंगरीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे स्थानकावरची ही गर्दी नवी नाही, मात्र आज ट्रेन उशिरा असल्यामुळे सगळेच ट्रेनमध्ये चढण्यासाठी घाई करत हाते. यावेळी या गर्दीत कुणाच्या हाताला लागलं तर कुणाच्या पायाला; त्यामुळे महिलांच्या किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकायला येत होत्या. मात्र, असा प्रवास टाळला पाहिजे; खरंच आयुष्यापेक्षा नोकरी महत्त्वाची आहे का? तर मुंबईकरांनो कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही. त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण असा जीवघेणा प्रवास नको.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महिलेला थांबवलं, बोलण्यात गुंतवलं अन् दोन मिनिटांत चार लाख रुपये केले लंपास; हिप्नोटाईजचा VIDEO पाहून बसेल धक्का

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. रेल्वेच्या मध्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही उशिरानं धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.