पुणे तिथे काय उणे या म्हणीची वारंवार प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. पण पुण्यात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. अलिकडेच पिंपरीच्या प्रेमलोक पार्क परिसरात एक विचित्र घटना समोर आल. येथे एका गुलमोहराच्या झाडाच्या खोडातून “पाणी” वाहत होते जे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक श्रद्धेने झाडाची पुजा करत आहे कारण त्यांना वाटते की, झाडाच्या खोडातून येणारे पाणी पवित्र आहे. पण झाडातून पाणी येण्यामागील खरे कारण महापालिकेने उघड केले जे ऐकून जे अत्यंत हास्यास्पद होते.

अंधश्रद्धेचा कहर! झाडातून येऊ लागताच लोकांनी सुरु केली पुजा

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सहारा सोसायटीच्या बाहेरील मुख्य रस्त्याजवळ ही घटना ६ जून, शुक्रवारी घडली. प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये या झाडाभोवती जमलेले दिसत आहे आणि ते झाडाला हार-फुले अर्पण करत आहेत आणि खोडावर हळद आणि कुंकू लावून अत्यंत मनोभावे पुजा करत आहे. स्थानिक लोकांना हे “चमत्कारिक पाणी” आहे असे वाटले ज्यामध्ये “उपचार शक्ती” आहे.

महानगरपालिकेने सत्य आणले समोर

पण ही घटना उघडकीस आल्यानंतर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) चौकशी सुरू केली, त्यानंतर त्यांना पाईपलाईन फुटल्याचे आढळले आणि झाडातून येणाऱ्या पाण्यामागील कारण उघड झाले.

पाहा Viral Video

X वर घटनेचा व्हिडिओ शेअर करताना एका वापरकर्त्याने लिहिले की, “पिंपरी चिंचवडच्या परिसरातील एका झाडातून पाणी येत असल्याचे पाहून, नागरिकांनी हार, फुले, हळद आणि केशर अर्पण करून झाडाची पूजा करण्यास सुरुवात केली. नंतर, काही सुज्ञ नागरिकांनी महानगरपालिकेला याबद्दल माहिती दिली आणि तपासणी दरम्यान, झाडाखालील पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे उघड झाले.”

नेटकऱ्यांचा संताप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे ऑनलाइन टीका आणि वादविवाद सुरू झाले आहेत.

“अंधश्रद्धेचा कहर! दोन हजार वर्षांपूर्वी जगाचा शिक्षक म्हणून ओळखला जाणारा भारत; जगात कुठेही आढळत नाही असे तत्वज्ञानी या एकाच ठिकाणी होते, त्याच भारताची आजची अवस्था पाहून वाईट वाटते,” असे एका वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले.

“२०२५ मध्येही अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहिल्यास आपण एक राष्ट्र म्हणून कशी प्रगती करू शकतो,” दुसऱ्याने कमेट केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०२५ आणि आम्हाला आश्चर्य वाटते की,”भारत प्रगती का करत नाही,” असे तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले. “जर आपण शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवेचा त्याच वेगाने पाठलाग केला तर आपण चमत्कारांचा पाठलाग करू,” असे मत एका वापरकर्त्याने मांडले.