वन्यप्राण्यांचे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी सापांचे मिलन, कधी जंगली हत्तीचा हल्ला, कधी सिंह किंवा वाघाचा शिकार करतानाचा थरारक क्षण तर कधी माकडांचा मजेशीर मस्ती…असे कित्येक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात. काही मोजकेच व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांच्या मनावर कायमची छाप पाडतात. अशाच एका सुंदर व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात रिद्धी वाघिण आणि तिच्या शावकांबरोबर पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ पाहून वन्यजीव प्रेमींच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. T-124 या ओळख क्रमांकाने ओळखल्या जाणाऱ्या रिद्धी वाघिण राजस्थानच्या रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात शावकाबरोबर पाण्यात खेळ आहे. शावकांसह वाघिण आरामदायी क्षणांचा आनंद घेताना दिसली.
रिद्धी वाघिण आणि तिच्या शावकांबरोबरचा व्हिडिओ चर्चेत
हा व्हिडिओ प्राध्यापक आणि वन्यजीव छायाचित्रकार ज्ञाना मोहंती यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या छोट्या क्लिपची सुरुवात वाघिण आणि शावकां एका लहानशा पाण्यात फिरताना होते. कॅमेरा त्यांच्या मागे येताच, त्यांची शावके त्यांच्या आईच्या जवळ राहून खेळत एकमेकांमघ्ये रमलेली दिसत आहे.
“द लेडी ऑफ द लेक” म्हणून ओळखली जाते रिद्धी वाघिण
रिद्धी ही “द लेडी ऑफ द लेक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित वाघिण मचालीची पाचव्या पिढीतील वंशज आहे. ती वाघिण अॅरोहेड (T-84) ची मुलगी आहे आणि तिने ऑनलाइन तिने प्रसिद्धी मिळवली आहे.
व्हिडिओ येथे पहा:
नेटकऱ्यांना आवडला शावकांबरोबर खेळणाऱ्या वाघणीचा व्हिडिओ
अपेक्षेप्रमाणे, या व्हिडिओचे भरपूर कौतुक झाले. “अविश्वसनीय फुटेज,” एका वापरकर्त्याने लिहिले. दुसर्या वापरकर्त्याने जोडले, “वाह, अद्भुत.” बहुतेक वापरकर्त्यांनी फक्त एकच शब्द वापरून त्यांचे विस्मय व्यक्त केले: “वाह.”
रिद्धी वाघिण नेहमीच चर्चेत
रिद्धी केवळ तिच्या वंशावळीमुळेच नाही तर अशाच काही क्षणांमुळेही चर्चेत राहते. तिच्या स्थिर उपस्थितिमुळेच आणि वाढत्या कुटुंबामुळे ती रणथंबोरच्या वाढत्या वाघांच्या संख्येत ती महत्वाची वंशज ठरली आहे. यापूर्वी, एका पर्यटकाने रिद्धी आणि तिच्या शावकांना शांतपणे तलाव ओलांडून चालताना पाहून खूप आनंद झाला होता, हा जंगलातील एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय क्षण होता.