शिकण्यासाठी वय नसतं असं म्हणतात याचच एक जिवंत उदाहरण केरळच्या कोट्टायम येथील १०४ वर्षीय आजींनी मांडलं आहे. त्यांनी केरळ राज्य साक्षरता अभियान (Kerala State Literacy Mission) परीक्षेत १०० पैकी ८९ गुण मिळवून अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. याची माहिती केरळ सरकारमधील शिक्षण आणि कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी ट्विटरवर दिली. त्यांनी पोस्ट केल्यापासून या आजीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

काय आहे ट्विट?

शिक्षण आणि कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी ट्विटरवर आजीचा फोटो शेअर केला आणि लिहिले “केरळ राज्य साक्षरता अभियानाच्या परीक्षेत कोट्टायम येथील १०४ वर्षीय कुट्टीअम्मा यांनी ८९/१०० गुण मिळवले आहेत. ज्ञानाच्या जगात प्रवेश करण्यासाठी वयाचा अडथळा नाही. अत्यंत आदर आणि प्रेमाने, मी कुट्टीअम्मा आणि इतर सर्व नवीन शिकणाऱ्यांना शुभेच्छा देतो.” ही सुंदर कॅप्शन देत त्यांनी कुट्टीअम्मा याचा फोटोही पोस्ट केला.

( हे ही वाचा: पद्मश्री विजेत्याकडून पंतप्रधानांना खास गिफ्ट; भेट पाहून मोदींच्या चेहऱ्यावर आलं हसू )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

काल पोस्ट केलेल्या ट्विटवर अनेकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. आजीचं कौतुक करत पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )

अनेकांसाठी ही खरच शिक्षण घेण्यासाठी एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे. यातून नक्कीच नेटीझन्स प्रेरित होईल त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा शिक्षण घेतील आणि त्यात यशही मिळवतील.