अमेरिकन गायिका केटी पेरीने (Katy Perry) नुकतेच लास वेगास येथे एका संगीत कार्यक्रमात लोकांचे लक्ष वेधून घेतले. खरंतर, या शोमध्ये तिने असा ड्रेस घातला होता की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केटी पेरीने परफॉर्मन्स दरम्यान बिअरच्या कॅनची ब्रा (beer can bra)घातली होती, ज्याने अनेक इंटरनेट वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
अशा विचित्र फॅशनचे नेटिझन्सला आश्चर्य वाटले. कारण परफॉर्मन्समध्ये बिअर कॅन केवळ कॅटीच्या ड्रेसवरच नाही तर स्टेजवरही होता. व्हिडीओमध्ये काही मिनिटांनी ती एका मोठ्या बिअर कॅनवर उभी राहून नाचताना देखील दिसत आहे. यासह, तिच्याभोवती नाचणाऱ्यांपैकी काहींनी पिझ्झासारखे तर काहींनी फ्रेंच फ्राईसारखे ड्रेस घातले होते.
(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
कॅटी रिसॉर्ट्स वर्ल्ड लास वेगासमध्ये ‘प्ले’च्या पहिल्या रात्री परफॉर्म करत होती. नवीन वर्षाच्या रात्री झालेल्या या कार्यक्रमात तिने दाखवलेला हा हटके ड्रेस नेटीझन्सना आवडला. कमेंट सेक्शनमध्ये युजर तिच्या या हटके स्टाइलबद्दल बोलत आहेत.
(हे ही वाचा: शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral)
(हे ही वाचा: थुंकून तंदूरमध्ये रोटी बनवणाऱ्याचा Video Viral; नेटीझन्सने केला संताप व्यक्त!)
केटी पेरीने आत्मचरित्र
संगीताव्यतिरिक्त केटी पेरीने आत्मचरित्र ‘केटी पेरी: पार्ट ऑफ मी’ आहे, जे २०१२ मध्ये प्रकाशित झाले. २०११ मध्ये आलेल्या ‘द स्मर्फ्स’ आणि त्याचा सिक्वेल ‘स्मर्फ्स २’ या कॉमेडी चित्रपटात तिने स्मर्फेटच्या पात्राला आवाज दिला होता.