Train Shocking Video : तुम्ही आजवर ट्रेनमध्ये सीटसाठी भांडतानाचे, हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. तसेच, अनेकदा ट्रेनच्या भरगच्च गर्दीत दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आणि अपघाताचेही व्हिडीओ पाहिले असतील. पण, सध्या ट्रेनमधील प्रवासाचा एक भयानक प्रकार समोर आला आहे; जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, प्रवासाचा हा नेमका काय प्रकार आहे. कारण- एक तरुण चक्क ट्रेनच्या छतावर चढून असा काही जीवघेणा प्रकार करतोय की, पाहणाऱ्यालाही धडकी भरेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेनच्या छतावर झोपून अतिशय धोकादायक काम करताना दिसत आहे. तुम्ही सर्वांनी ट्रेनमध्ये बसून प्रवास केला असेल; पण तो प्रवासी चक्क ट्रेनच्या इंजिनाच्या छतावर झोपून समोरच्या दिशेने पाहत प्रवास करीत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण चक्क ट्रेनच्या पुढे असलेल्या इंजिनाच्या छतावर सरळ झोपला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो इंजिनावरील लाल बत्तीला पकडून तो आपला तोल सांभाळतोय. यावेळी तरुण एका हाताने कॅमेरा पकडून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करीत आहे. वेगाने धावणाऱ्या ट्रेनमुळे त्याला आपला तोल सांभाळणेही कठीण झालेय. तरी थरथर कापत तो असा जीवघेणा प्रवास करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे; पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नाही. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आता लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अकाउंटवरून शेअर करीत आहेत. पण, हा व्हिडीओ भारतातील नाही, तर बांगलादेशमधील असल्याचा दावा केला जात आहे.

ट्रेनमधील या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडीओ rahul_baba_ki_masti_नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना लोकांना, असा प्रयत्न करू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – India Railways : ट्रेनच्या डब्यावर H1, H2, A1 का लिहिलेले असते? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

View this post on Instagram

A post shared by Rahul Gupta (@rahul_baba_ki_masti_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिले की, पुढचा व्हिडीओ पोलिस स्टेशनमध्ये माफी मागतानाचा येईल. दुसऱ्याने लिहिले की, असा प्रयत्न करू नका. तिसऱ्याने म्हटलेय की, चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्याला तुरुंगात टाकले पाहिजे.