Shocking video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीनं ‘आ बैल मुझे मार’ एका ऑटो चालकाने ही म्हण प्रत्यक्षात आणली आहे.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापात हल्ला करताना दिसून येतात. नुकताच एका संतापलेल्या बैलाचा व्हिडीओ समोर आलाय. 

बैलांच्या नादाला लागणं आलं अंगलट

व्हिडिओमध्ये दोन बैल आपापसात भांडताना दिसत आहेत. आणि हा ऑटोचालक आपली रिक्षा घेऊन बैलांमध्ये गेला. यानंतर बैलांनी ऑटोचालकाला काय केले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन बैल गर्दी असलेल्या रस्त्यावर आपापसात भांडताना दिसत आहेत. जवळ उभ्या असलेला प्रत्येकजण तिथून लांब गेला, मात्र एक ऑटोचालक त्या बैलांकडे येतो आणि त्यांना मारतो. त्यानंतर तो आपली रिक्षा उलट्या दिशेने नेत त्यांना ठोकण्याचा प्रयत्न करतो मात्र बैल रिक्षाच पलटी करतात. आजूबाजूला पाहणारा प्रत्येकजण थक्क होतो. टक्कर झाल्यानंतर आपापसात भांडणारे बैल वेगळे होतात. यानंतर बैल तिथून पळून जातात तर लोक रिक्षा चालकाला वाचवण्यासाठी येतात. आणि त्याची रिक्षा सरळ करा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ चित्ता आणि हरणामध्ये झटापट; हरणाच्या ‘त्या’ झेपेची सोशल मीडियावर चर्चा

लोक कमेंट करत आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर @PalsSkit नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १.१५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे काहीही करू शकतात.’ आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘मला दोन लोकांच्या अडचणीत पडायचे नव्हते, आता मी अडचणीत आहे.’ दुसऱ्या युजरने ‘इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे’ असे म्हटले आहे.