सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडीओ एकापेक्षा एक असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही उखाण्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कधी लग्नामध्ये नवरी हटके उखाणा घेते तर कधी नवरदेव. कधी एखाद्या आजींबाईचा जुन्या काळातील भला मोठा उखाणा चर्चेत येतो तर कधी आज कालच्या मॉर्डन सुनेचा मॉडर्न उखाणा व्हायरल होतो. सध्या असा एक मजेशीर उखाणा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे उखाणा. कोणत्याही शुभप्रसंगी किंवा लग्नाच्या वेळी उखाणा घेण्याची परंपरा आहे. काव्यस्वरुपात आपल्या जोडीदाराचे नाव घेणे, यालाच उखाणा म्हणतात. उखाणा घेताना कधी महिला नवऱ्याच्या चांगुलपणाचे कौतूक करतात तर कधी नवऱ्याला शालूमध्ये जोडे मारतात. असाच काहीसा उखाणा सध्या चर्चेत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नववधू जोडपे दिसत आहे, ज्यांनी पारंपारीक पोशाख परिधान केले आहे. नववधू उखाणा घेताना म्हणते., “संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा, वैष्णवीने पसारा केला तर रोहनने तो आवरायचा.”

हेही वाचा – सायकल चोरी होऊ नये म्हणून वापरला ‘हटके जुगाड’; चोरी करणाऱ्यांना शिकवला धडा; Viral Video एकदा बघाच

हा उखाणा ऐकूण उपस्थितांना हसू आवरत नाही. लोक नवरदेवाला पसरा आवरण्यावरून चिडवताना दिसत आहे. आजच्या काळातील तरुणींची अपेक्षा असते की नवऱ्याने घराच्या जबाबदारीमध्ये मदत करावी.या नववधूने ही अपेक्षा उखाण्याच्या स्वरुपात बोलून दाखवली आहे. लोकांना तरुणीचा उखाणा फार आवडला आहे. व्हिडीओवर अनेकजण कमेट करत आहे. कोणी रोहनला काम करायाला लागणार म्हणून त्याची फिरकी घेत आहे तर कोणी त्याची बाजू घेत आहे.

हेही वाचा – तुमच्या जीन्सचा काळा रंग फिका पडलाय का? मग ‘ही’ सोपी ट्रिक वापरा अन् घरच्या घरी द्या रंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओवर एकाने कमेंट केली आहे की, “रोहितला तेवढंच काम नाहीये.” दुसरा व्यक्ती म्हणतो की, “रोहन लावतोय आता भांडी घासायला” व्हिडीओवर एक रोहन नाव असलेला व्यक्ती म्हणतो, “(पसारा) आवरेल आवरेल, आधी वैष्णवी तर भेटू द्या”