US Man Turns His Eye Into A Flashlight: अमेरिकेतील एका ३३ वर्षीय व्यक्तीने एक लक्षवेधी नवीन निर्मिती केली आहे. कर्करोगाने आपला एक डोळा गमावलेल्या अमेरिकेचा रहिवासी ब्रायन स्टॅनलीने स्वतःचा कृत्रिम डोळा बनवला आहे. या व्यक्तीने त्याचा कृत्रिम डोळा पूर्णपणे काम करणाऱ्या टॉर्चमध्ये बदलला आहे. गॅजेट गीक आणि इनोव्हेटरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात त्याने त्याचा कृत्रिम डोळा दाखवला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही हेडलॅम्पप्रमाणे डोळ्यातून प्रकाश बाहेर पडताना पाहू शकता. त्याने स्वतः खोलीमधील लाईट बंद करून डोळ्यातून येणाऱ्या प्रकाशाचा डेमो दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅन्सरमुळे डोळा खराब झाला तर लावला असा शोध

व्हिडीओमध्ये ब्रायन स्टॅनलीने सांगितले की, टायटॅनियम स्कल लॅम्प अंधारात अभ्यास करण्यासाठी योग्य आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तो गरम होत नाही आणि याची बॅटरी लाइक २० तासांची असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या व्हिडिओंची खूप प्रशंसा होत आहे. या व्हिडिओला अवघ्या २ दिवसांत १ मिलियन पेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत.

( हे ही वाचा: Rishi Suman: गायिका अलीशा चिनॉयने ऋषी सुनक यांना दिल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा; बनवली ‘राम-सीता’ जोडी, पाहा Viral Video)

( हे ही वाचा: स्कूल बसमधील विंडो सीटवरुन मुलगा-मुलगीची तुंबळ हाणामारी; दोघांनी लगावली एकमेकांच्या कानशिलात,Video होतोय व्हायरल)

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिले की, ‘भाऊ याने हॅलोवीन टर्मिनेटर सहज हलवू शकतात.’ दुसर्र्‍याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, ‘मला माहित आहे की प्रत्येकजण साय-फायचा विचार करत आहे, परंतु मी विचार करत आहे की हा कॅम्पिंगसाठी किती फायदेशीर आहे .’ ब्रायन स्टॅन्लेने सायबोर्ग डोळा बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्याने ‘टर्मिनेटर’ चित्रपटातील अर्नॉल्ड श्वार्झनेगरच्या पात्राप्रमाणेच एक कृत्रिम डोळा तयार केला होता. तो म्हणतो की नवीन रंग त्याला ‘पॉवर स्टोन’ ची आठवण करून देतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us man turns his eyes into a flashlight after losing it to cancer watch a video gps
First published on: 27-10-2022 at 14:51 IST