जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी आपल्याबरोबर काय अनपेक्षित घटना घडू शकते. अशीच एक घटना एका महिलेबरोबर घडली आहे. ही महिला दररोजप्रमाणे जिममध्ये व्यायाम करायला गेली होती. पण यावेळेस तिच्याबरोबर अशी एक घटना घडली, जी ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अमेरिकेत ओहायो येथे राहणारी एक महिला व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेली होती. मात्र, येथे तिच्याबरोबर एक दुर्घटना घडली. व्यायाम करण्याऐवजी तिला लगेचच आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांना बोलावून घ्यावे लागले. क्रिस्टीन फॉल्ड्स असे या महिलेचे नाव असून तिच्यासोबत घडलेली ही विचित्र घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Photos : आता YouTubeवर विना जाहिराती बघता येणार Video; फक्त करा ‘हे’ काम

या महिलेसोबत ही घटना रात्री उशिरा तीनच्या सुमारास घडली. ती २४ तास पॉवरहाऊस जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी गेली होती. ती बाई इन्व्हर्जन टेबलावर गेली होती. ही मशीन आपल्या मणक्याला ताणते आणि संपूर्ण शरीर उलटे करून पाठदुखीपासून आराम देते. यावेळी महिला स्वतःचा व्हिडीओ बनवत होती, त्याच दरम्यान ती या मशीनमध्ये अडकली. द इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार, तिची टाच टेबलमध्ये लॉक झाली आणि यामुळे तिला हालचाल करता येत नव्हती. सुरुवातीला तिने स्वतःहून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण तिला ते जमले नाही.

नमकीन विकणाऱ्याचा हटके अंदाज पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही महिला भयंकर घाबरलेली. मात्र सुदैवाने तिने स्मार्टवॉच घातली होती. तिने लगेचच तिच्या स्मार्टवॉचवरून ९११ नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीलाही बोलवत होती, पण मोठ्या आवाजामुळे तो तिला ऐकू शकला नाही. अखेरीस तिने पोलिसांना बोलावले आणि थोड्याच वेळात एक आपत्कालीन अधिकारी तिथे आला. त्याने लगेचच क्रिस्टीनला मशीनमधून बाहेर काढले. सुदैवाने या दरम्यान तिला कोणतीही दुखापत झाली नाही. सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे.