Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भावुक करणारे असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयसीयू दाखवला आहे आणि या आयसीयूमध्ये काही रुग्ण मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे. त्यांना पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
असं म्हणतात, पैसा कितीही असू द्या पण जेव्हा मृत्यूशी झुंज द्यायची वेळ येते तेव्हा पैसा संपत्ती काहीही उपयोगाची नसते. पैसा असूनही कधीकधी जीव वाचत नाही.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हॉस्पिटलमधील एक आयसीयू दिसेल. या आयसीयूत अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे. लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वच वयाची लोक मृत्यूशी लढताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला डॉक्टर आणि नर्स सुद्धा दिसतील. ते प्रत्येक रुग्णाकडे बारकाईने लक्ष देत आहे. मन सुन्न करणारा हा व्हिडीओ पाहून कोणाचेही डोळे पाणावतील. या व्हिडीओवर लिहिलेय, “थोडावेळ इथे थांबून बघा. संपत्तीची नशा पूर्ण उतरून जाईल.”
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
amrutvel_1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इथे फक्त जगण्यासाठी संघर्ष “
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असा दिवस कोणावरही येऊ नये” तर एका युजरने लिहिलेय, “मी इथे वडिलांना घेऊन 15 दिवस होतो.. तो आवाज त्या मशीनांचा.. अजुनही माझ्या कानात ऐकण्याचा भास होतो.. कारण तिथे आपल्या सारखे प्रत्येकाला सुखरूप घरी जायचे असते.. परंतु तसे होत नाही.. आ जेवढे वॉर्ड मध्ये पेशंट होते.. सगळे सुखरूप घेऊन गेलेत.. माझ्याच नशिबी वडील नव्हते..” आणखी एका युजरने लिहिलेय, “खुप वाईट वेळ ही कोणावर येऊ नये मला चांगला अनुभव आहे कोणी येत नाही” एक युजर लिहितो, ” चांगल्या चांगल्याचा इथं माज उतरतो, माझा पण इथेच उतरला…. जेव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा एक महिना इथे होता” अनेक युजर्सनी आपले चांगले वाईट अनुभव शेअर केले आहेत.