Stunt Video Viral on Social Media: प्रत्येक बाईकरची अशी इच्छा असते की त्याच्याकडे महागात महाग गाडी असावी. जेणेकरून संपूर्ण स्पीडनं ही गाडी पळवून स्टंट करता येतील. याच कारणामुळे ज्यांच्याकडे अशा बाईक असतात ते आपला जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंट करताना दिसतात. स्टंटबाजी करताना अनेकांचा जीवही जातो. मात्र, तरीही लोक असे स्टंट करत राहतात. सध्या असाच एक स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.काही लोकांना स्टंट करण्याची खूप क्रेझ असते. बऱ्याच वेळा लोक असे स्टंट करतात, जे पाहूनच अंगावर काटा उभा राहतो. कधीकधी लोक धोकादायक स्टंट करताना आपला जीव देखील गमावतात. असं असूनही लोक यातून धडा घेत नाहीत. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या बाईकवर हात सोडून उभा राहून स्टंटबाजी करत आहे.
धावत्या दुचाकीवर जीवघेणा स्टंट करणे आणि रस्त्यावरील इतर पादचारी आणि प्रवाशांच्या जीवाला संभाव्यपणे धोका निर्माण केल्याबद्दल नवगंज पोलीस स्टेशनमध्ये या तरुणाविरोधता गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना कानपूर परिसरात घडली. घटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तरुणावर गुन्हा दाखल
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण चालत्या दुचाकीवर उभा राहून टायटॅनिक पोज देत स्टंटबाजी करतो आहे. अंगावर रोमांच उभा करणारा हा थरारक व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.बाईक स्टंटची ही घटना नवनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंगा बॅरेज परिसरात घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी त्या तरविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३३६ अंतर्गत गुन्हा नोंदवला, जो जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त, उन्नाव पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार त्याला १२,००० रुपयांचा दंड ठोठावला. उन्नाव येथे गुन्हा दाखल होण्याचे कारण असे की, बाईक उन्नावमध्ये नोंदणीकृत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ मृत्यूच्या दारात माकडाने केला पँथरचा मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video
नवाबगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना
सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) महेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, “आज सोशल मीडियावर बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवाबगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भागातील आहे. पोलिसांनी स्टंट करणाऱ्या व्यक्तीस तत्काळ ताब्यात घेतले आहे. व्हिडीओची दखल घेऊन त्याच्यावर आयपीसीच्या कलम ३३६ अंतर्गत गुन्हा नोंदवलागेला आहे.” अशाच एका प्रकरणात, कानपूर पोलिसांनी यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांसमोर त्याच्या मोटारसायकलवर धोकादायक स्टंट केल्याबद्दल आणखी एका व्यक्तीला ५,००० रुपयांचा दंड ठोठावला होता.