Crow Video: लहानपणी तहानलेल्या कावळ्याची गोष्ट तुम्ही अनेकदा वाचली किंवा ऐकली असेल. या कथेमध्ये एक कावळा होता, त्याला खूप तहान लागली होती. तो पाण्याच्या शोधात असतो. तेवढ्यात त्याला पाण्याचा एक माठ दिसतो. पण या माठात तळाशी पाणी असतं, मग ते पाणी पिण्यासाठी कावळा युक्ती लावतो. तो कावळा त्या माठात एक एक करुन खडे टाकतो. त्यामुळे ते पाणी वर येतं आणि मग तो पाणी पिऊन उडून जातो. हे सगळं आपण कथेमध्ये ऐकलं वाचलं. पण आता सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कावळा अगदी कथेतील कावळ्यासारखं पाणी पिताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा कावळा कथेतील कावळ्यासारखीच काॅपी करताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कावळा पाण्याच्या बाटलीकडे जातो. या बाटलीतील पाणी तळाशी गेलेले असते. पण हा हुशार कावळा खऱ्या आयुष्यात बाटलीतून पाणी पिण्यासाठी चक्क एक एक खडे टाकताना दिसतो. त्यामुळे पाण्याची पातळी वर येताना दिसते आणि त्यानंतर हा कावळा पाणी पिऊन आपली तहान भागवतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पूर्णपणे थक्क झाले आहेत. लहानपणी वाचलेली ही तीच कथा आहे, असे लोकांना वाटते.

(हे ही वाचा : खतरनाक! पिसाळलेला बैल थेट घरात शिरला; बायकांना उडवलं, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. gunsnrosesgirl3 नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला ७५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे, “हा कावळा खूप हुशार आहे.”