एखादा सण असुदे किंवा एखाद्याचा खास दिवस असल्यास आपण त्यांना विशेष शुभेच्छा देतो. म्हणजे, कुणाचा वाढदिवस असेल तर आपण त्याला, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणतो; किंवा कोणता सण असल्यास ‘तो सण सर्वांना सुखाच, समाधानाचा आणि आनंदाचा जावा’ यासाठी शुभेच्छा देतो. मात्र कधी एखादा ‘ऋतू’ चांगला आणि बिना त्रासाचा जावा यासाठी कुणी तुम्हाला ‘हार्दिक शुभेच्छा’ दिल्या आहेत का?

हा प्रश्न ऐकून चमकलात ना? आता उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यामुळे अचानक खिडकीतून छोटीशी वाऱ्याची गार झुळूक आली कि मनाला आनंद मिळतो. उन्हातान्हाचे घराबाहेर पडल्यावर वाटेत झाडाची थंड सावलीनेसुद्धा आपल्याला आराम मिळतो. पण इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील एका चिमुकल्याने अत्यंत भन्नाट अशा शैलीत, ज्या उन्हाळ्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत; त्या पाहून तुमचा यंदाचा उन्हाळा अधिक चांगला जाईल… नेमके हा चिमुरडा म्हणतोय तरी काय एकदा पाहा.

हेही वाचा : Video : “ही काय जेवायची जागा आहे”! डिनर डेटचे ‘हे’ स्थळ पाहून हृदयात भरले धडकी….

तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर unique_status02 नावाच्या अकाउंटने, सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक चिमुकला मुलगा त्याच्या खणखणीत आवाजात आणि मजेशीर शैलीत नेटकऱ्यांना उन्हाळ्याच्या शुभेच्छा देत आहे. शुभेच्छा देताना तो काय म्हणतो पाहा. सुरवातीला “नमस्कार…” असे म्हणून व्हिडिओची सुरवात करतो. नंतर “तुम्हाला सर्वांना, उन्हातान्हाच्या हार्दिक शुभेच्छा..” असे म्हणत नव्या ऋतूच्या शुभेच्छा देतो. तसेच तुमचा दिवस चांगला आणि आरामदायी जाऊदे यासाठी, “आपला दिवस सावलीत जावो” असे म्हणून खळखळून हसतो. इतकेच या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसते.

उन्हाळ्याच्या या भन्नाट आणि आगळ्यावेगळ्या शुभेच्छांवर नेटकऱ्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहू.

“अरे मुला अभ्यास कर रे…” असा एकाने सल्ला त्या चिमुकल्याला दिला आहे. “तुम्हालाही शुभच्छा’ असे दुसऱ्याने लिहिले आहे. “दसऱ्याच्या शुभेच्छा भावा” असे तिसऱ्याने म्हंटले आहे. तर अनेकांनी डोळ्यातून पाणी येणाऱ्या स्मायली इमोजी प्रतिक्रियेच्या स्वरूपात दिलेल्या आहेत.

हेही वाचा : Video : गॅस वाचवण्यासाठी केलेला जुगाड पाहून नेटकरी चक्रावले; म्हणाले, “ओ ताई, एवढी बचत…”

View this post on Instagram

A post shared by ?????? ??????? ?️ (@unique_status_ap)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा हा भन्नाट व्हिडीओ पाहून यंदाचा उन्हाळा सर्वांसाठीच खूप चांगला आणि ‘सावलीत’ जाईल असे आपण म्हणून शकतो. इन्स्टाग्रामवर @unique_status02 नावाच्या अकाउंटने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. याला आत्तापर्यंत ५.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.