Viral Video Show father-daughter bond : बाबा-लेक यांचे नाते म्हणजे शब्दांत मांडता न येणारी एक कविता म्हणायला हरकत नाही.आई म्हणजे घराच्या चार भिंती, पण वडील म्हणजे घराचे छतच असते. सण-उत्सवावर, कुटुंबातील सर्व सदस्यांना नवीन कपडे पण, स्वतःला स्वतः मात्र जुने शर्ट, बूट घालणारी व्यक्ती म्हणजे बाबा.आई ९ महिने पोटात वाढवते तर बाबा सुद्धा आपलं पुढील आयुष्य कसं सुरळीत सुरु राहील यासाठी धडपडत असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबा ऑफिसवरून घरी आल्यानंतर त्याचे खास स्वागत करण्यात आले आहे.

गणेशउस्तवादरम्यान ‘आया हैं राजा लोगो रे’ या गाण्यावर बाप्पाच्या समोर उभं राहून खास डान्स करण्याचा एक ट्रेंड सुरु होता. पण, तीन बहिणींनी हा ट्रेंड त्यांच्या बाबांबरोबर करण्याचा निर्णय घेतला. आई बेडवर बसलेली असते आणि तिन्ही बहिणी बाबा ऑफिसवरून कधी येणार याची वाट पाहत असतात. घरात उपस्थित एक व्यक्ती व्हिडीओ शूट करत असते. त्यानंतर बाबा पाठीला बॅग लावून ऑफिसवरून घरी येतात. तितक्यात ‘आया हैं राजा लोगो रे’ गाणं सुरु होतं आणि पुढे नेमकं काय घडतं व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…बाईईई…! आज्जीची मशेरी लावण्याची सवय, नातवाने निक्कीच्या स्टाईलमध्ये गायलं गाणं; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

खरा राजा माणूस…

मुलीच्या जन्मापासून ते मरेपर्यंत तिच्यावर भरपूर प्रेम करणारी तिच्या आयुष्यात एकच व्यक्ती असते ती म्हणजे बाबा. त्यामुळे आपला राजा आपला बाबाच आहे अशी मुलींची भावना असते. कारण – बाबाने अगदी राजकन्येसारखं मुलींना वागवलेलं असते.म्हणून तिन्ही मुली बाबांबरोबर हा व्हिडीओ शूट करतात. तर व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बाबा घरात येताच तिन्ही मुली त्यांचे स्वागत करत ‘आया हैं राजा लोगो रे’ गाणं म्हणतात. त्यानंतर आईला पण बरोबर घेऊन फेर धरून नाचण्यास सुरुवात करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलींकडून मिळालेलं हे खास सरप्राईज पाहून बाबा देखील खुश झाले आहेत, हे तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नक्कीच कळेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ramanedange या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काल शेअर करण्यात आला आहे. ‘आमचा खरा राजा माणूस पप्पा, ज्यानं आम्हाला राजकन्येसारखं वाढवलं’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ या ट्रेंडच बेस्ट रील आहे असे म्हणत आहेत. एकूणच या व्हिडीओला पसंती मिळताना दिसत आहे.