scorecardresearch

Viral Video: बॉक्सिंग चँपियन माइक टायसननं विमानातच केली प्रवाशाची धुलाई, कारण…

माइक टायसनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Mike Tyson Viral Video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @MMAMEDlA /Twitter)

Mike Tyson Viral Video: माइक टायसन (Mike Tyson) हे बॉक्सिंगच्या विश्वातील एक मोठे नाव आहे. आपल्या कारकिर्दीत या हेवीवेट चॅम्पियन बॉक्सरने बड्या दिग्गजांना हरवले आहे. पण बॉक्सिंग रिंगच्या बाहेर माइकची कोणाशी तरी भांडण झालं आहेत, असे आतापर्यंत काहीही ऐकायला मिळाले नाही. पण नुकताच माइक टायसनच्या एका व्हायरल व्हिडीओने नेटीझन्सना विचारात पाडले आहे.

एका व्यक्तीचा टायसनला आला राग

माइक टायसनचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यामध्ये तो विमानात बसलेल्या सहप्रवाशाला जोरदार धक्काबुक्की करत दिसत आहे. पाहिलं तर माइक रिंगच्या बाहेर अगदी शांत राहतो, पण विमानातल्या एका सहप्रवाशाच्या कृत्यामुळे त्याला राग आला. माइकसोबत विमानात प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने त्याला वारंवार त्रास दिला, त्यानंतर माईकने त्याला मारलं.

(हे ही वाचा: Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली खारुताई तुम्हाला सापडतेय का?)

काय झालं नक्की?

प्रत्यक्षात असे घडले की माइक टायसन फ्लोरिडाला विमानाने प्रवास करत होता. विमानात बोर्डिंग झाले होते आणि माइक त्याच्या सीटवर बसला होता. त्यानंतर त्याच्या मागे बसलेल्या एका व्यक्तीने त्याच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न केला. सहसा, चाहते हे कोणत्याही मोठ्या व्यक्तीला पाहिल्यानंतर असचं करतात. मात्र हा प्रवासी एका क्षणी आपली मर्यादा विसरला आणि त्याने समोर बसलेल्या माइकला सतत त्रास देण्यास सुरुवात केली.तो माणूस शांत बसायचंनाव घेत नव्हता आणि त्याने त्याच्या मित्राला माइकचा व्हिडीओ बनवण्यास सांगितले.

(हे ही वाचा: Viral Video: हरणाच्या शेपटातील फर काढून कावळ्याने बनवले घरटे, व्हिडीओ बघून नेटकरी आश्चर्यचकित)

(हे ही वाचा: वराने वरमाळा घालताच, वधूने मारली कानाखाली आणि…; Video Viral)

चेहऱ्याचा नक्षाच बदलला

त्यानंतर माइक टायसनला त्याच्या या कृतीचा खूप राग आला. माइक त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि त्याने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एकापाठोपाठ एक ठोसे मारले. माइकने त्या व्यक्तीच्या तोंडावर इतके ठोसे मारले की नंतर त्याचे रक्तही बाहेर येऊ लागले. त्यानंतर विमानात बसलेल्या इतर लोकांनी माइक टायसनला शांत केले आणि या कृत्यानंतर तो विमान सोडून खाली उतरला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video viral mike tyson punched a fan face after he got irritated with him in flight ttg

ताज्या बातम्या