Viral news: हल्लीची मुलं ही फारच स्मार्ट आहेत असं म्हटलं जातं. शाळकरी मुलं त्यांच्या कृतीनं चर्चेचा विषय ठरतात.शालेय जीवनात विद्यार्थी जेवढ्या उचापाती करतात त्या प्रत्येकाच्या कायमच स्मरणात असतातच. पण काही विद्यार्थी हे असेही असतात त्यांच्या एका कृतीने खूपच प्रसिद्ध होऊन जातात. पूर्वीही काही असे विद्यार्थी असतीलच पण त्यांच्या या उचापाती जास्त लोकांच्या समोर आल्या नसतील. पण सध्या सोशल मीडियाच्या जगात अशा कृती लगेचच व्हायरल होतायत. अशाच एका विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध सध्या जोरदार व्हायरल होतोय.

एका शालेय विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल होत आहे. उत्तरपत्रिका व्हायरल होण्यामागे विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध हे आहे. या निंबधाचा विषय दुसरा काही नसून शिक्षक हाच होता. मुलांना शिक्षकांवर निबंध लिहायल सांगितला होता, यावेळी एका मुलानं काय निबंध लिहला हे तुम्हीच वाचा. एका विद्यार्थ्याने आपल्या निबंधात आपल्या आवडत्या शिक्षकाचे गुण आणि गुणगान इतकं लिहिलंय की ते वाचून ‘लहान मुलं किती प्रामाणिक असतात’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

व्हायरल झालेल्या या सहावीतील विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने त्याच्या आवडत्या शिक्षकावर निबंध लिहिला आहे. त्याने निबंधात जे लिहिले आहे त्यावर युजर्स हसत आहेत. त्याचवेळी, काही वापरकर्ते चांगले गुण मिळविण्याचा हा एक योग्य मार्ग असल्याचे सांगत आहेत. निबंधात लिहिले आहे की, “मला सर्व शिक्षक आवडतात, पण सर्वात आवडत्या भूमिका मॅडम आहेत, ज्या आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगतात, शिकवतात आणि आमच्यावर खूप प्रेम करतात.”शिक्षकांचे कौतुक करताना विद्यार्थ्याने शेवटी लिहिले आहे की, ‘देव सर्व शिक्षकांना आशीर्वाद देवो जर ते आमच्या मॅडमसारखे असतील तर मुले मनापासून अभ्यास करतील.’ यासोबतच विद्यार्थ्याने आय लव्ह यू भूमी मॅम असेही लिहिले आहे.

पाहा विद्यार्थ्याची व्हायरल उत्तरपत्रिका

हेही वाचा >> बापरे! तरुणी कारच्या विंडोबाहेर घेत होती सेल्फी; पुढच्याच क्षणी जे झालं…VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पोस्ट आतापर्यंत ५२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. विद्यार्थ्याची ही उत्तरपत्रिका @Rajputbhumi157 या अकाऊंटवरुन एक्सवर शेअर करण्यात आली आहे. यावर नेटकरी भरभरुन कमेंट करत आहेत.