हल्ली लग्नसोहळ्यात अमाप खर्च केला जातो. आपलं लग्न सर्वात वेगळं आणि लक्षात राहावं असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. यासाठी ते काही युनीक प्रयत्न करत असतात. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी या हौशी जोडप्यानं नातेवाईकांसाठी संपूर्ण फ्लाईट बूक केली आहे. फक्त फ्लाईटच बूक केली नाहीतर विमान लँड झाल्यानंतर उडत्या विमानात या जोडप्यानं चक्क डान्स केला आहे.
विमान 36,000 फूट उंचीवर असताना डान्स
या व्हिडीओमध्ये दिसणारे लोक फ्लाईटनं लग्नाला चालले आहेत. यावेळी श्रुतिका आणि शुभम नावाचे जोडपे दिसत असून त्यांनी सूंदर असे पारंपारिक कपडे परिधान केले आहेत. दरम्यान त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी जाताना फ्लाईटमध्ये दोघांनीही ‘मान मेरी जान’ या गाण्यावर या जोडप्यांनी हटके डान्स केला आहे. यावेळी त्यांच्या या डान्सला नातेवाईकांनीही टाळ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे हे विमान 36,000 फूट उंचीवर असताना हा डान्स परफॉरमन्स करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ –
व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जय करमानी नावाच्या युजरने शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओला प्रचंड पसंती मिळत असून आतापर्यंत जवळपास 4 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.