सोशल मीडियावर तुम्हाला जुगाडपासून आयुष्यातील प्रत्येक क्षणावर भाष्य करणारे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही वेळा हे व्हिडीओ पाहून हसू आवरणे कठीण होते, तर काही वेळा मन गहिवरून येते आणि डोळ्यातून आपोआप अश्रू येऊ लागतात. कधीकधी काही यूजर्स आयुष्यातील असे काही क्षण शेअर करतात जे पाहताना डोळ्यात पाणी येते. व्हिडीओतील गोष्टी आपण आपल्या आयुष्याशी रिलेट करू लागतो. सध्या असाच खऱ्या प्रेमाचा एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून खरेच वाटते की, प्रेमाला वयाचे बंधन नसते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स भावुक होत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वयस्क आजोबा रस्त्याच्या कडेला सरबताचा ग्लास घेऊन उभे असतात. या वेळी आजोबांनी स्वत: सरबत पिण्याआधी ते एका फोटोला अर्पण केले. हा फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर त्यांच्या प्रिय पत्नीचा असतो. आजोबांनी आपल्या कृतीतून आयुष्यातील खऱ्या प्रेमाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहणाऱ्यांचे मनही आता भावुक होताना दिसत आहे. आजोबांचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
भर उन्हात पाण्याविना तडफडत होती चिमणी, दयाळू व्यक्तीने वाचवला जीव; हृदयस्पर्शी Video Viral
आजोबांचे प्रेम पाहून यूजर्स झाले भावुक
हा सुंदर व्हिडीओ @gurpinder_sandhu33_ या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. जो आता अनेकांची मने जिंकत आहे. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, जेव्हा कोणी मला विचारेल की खरे प्रेम काय आहे, तेव्हा मी त्याला हा सुंदर व्हिडीओ दाखवेन. तर दुसर्याने लिहिले की, आज मी सोशल मीडियावर पाहिलेला हा सर्वोत्तम व्हिडीओ आहे. त्याचबरोबर इतर यूजर्सनीही आजोबांचे प्रेम खरे असल्याचे म्हणत, आमच्याकडे आता भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, असे म्हटले आहे. हा काळजाला भिडणारा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.