Viral Video: शिक्षण किंवा नोकरीसाठी अनेक मुली घरापासून लांब वसतिगृहांमध्ये राहतात. पण, हॉस्टेलमध्ये राहताना नेमून दिलेलं जेवण जेवावं लागतं. त्यामुळे बऱ्याच जणींना आईच्या हातच्या जेवणाची किंवा बाहेरच्या चटपटीत पदार्थांचीसुद्धा खूप आठवण येत असते. आपल्या आवडीचे पदार्थ अनेकदा हॉस्टेलवर मिळणं शक्य नसतं. त्यामुळे काही जण जुगाड करून त्यांच्या आवडीचे चमचमीत पदार्थ बनविताना दिसून येतात. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात तरुणींनी हॉस्टेलमध्ये गॅसचा वापर न करता, चक्क बिर्याणी बनवली आहे.

हॉस्टेलमध्ये अनेक अनोळखी मुलींची आपापसांत मैत्री होते. मग हॉस्टेलच्या रूममध्ये नवीन मैत्रिणींसोबत अभ्यासाबरोबर मजा-मस्तीही केली जाते. आज या तरुणींना बिर्याणी खाण्याची इच्छा झाली होती आणि ती इच्छा त्यांनी चक्क इलेक्ट्रिक किटलीद्वारे पूर्ण केली आहे. त्यांचा हा प्रताप पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओमध्ये एक तरुणी सुरुवातीला इलेक्ट्रिक किटलीमध्ये अंडा बिर्याणीसाठी सगळ्यात आधी तांदूळ शिजवून घेते आणि भात तयार करते. नंतर अंडी आणि बिर्याणीसाठी लागणारे अनेक पदार्थ शिजवून घेते आणि स्टेप बाय स्टेप कृती व्हिडीओत दाखवते. इलेक्ट्रिक किटलीमध्ये बनविलेली अंडा बिर्याणी एकदा तुम्हीसुद्धा पाहाच.

हेही वाचा…ना हाणामारी, ना वाद… तरीही रस्त्याच्या मधोमध थांबले बस अन् चारचाकी चालक; प्रेमळ भांडणाचा हा VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, वसतिगृहांमध्ये तरुणींनी बिर्याणी बनविण्याचा बेत आखला आहे. पण, वसतिगृहात गॅस, कुकर व इतर स्वयंपाक बनविण्याची भांडी नसल्यामुळे त्यांनी इलेक्ट्रिक किटलीमध्ये बिर्याणी बनविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची बिर्याणी खाण्याची इच्छा पूर्ण केली आहे. इलेक्ट्रिक किटली खासकरून पाणी गरम करण्यासाठी वापरली जाते. पण, यात काही जण मॅगीसुद्धा बनवतात. पण, आज तर तरुणींनी चक्क यात बिर्याणी बनवली आणि सगळ्यांनाच थक्क करून सोडलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ उजाला या तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हॉस्टेलमध्ये राहणारे अनेक तरुण-तरुणी इलेक्ट्रिक किटलीमध्ये कोणकोणते पदार्थ बनवतात हे ते कमेंट्समध्ये सांगताना दिसून आले आहेत. ‘हॉस्टेलवाले इलेक्ट्रिक किटलीमध्ये काहीही बनवू शकतात,’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.